

Treesha thosar 71st national film award
मुंबई - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा एक वेगळीच झलक पाहायला मिळाली. मोठमोठ्या कलाकारांसोबत एका लहानशा बालकलाकाराने प्रेक्षकांचे मन जिंकले. ही बालकलाकार म्हणजे त्रिशा ठोसर. तिचे वय फक्त पाच आहे. पण आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत आणि सर्वांना नमस्कार करत ती नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये आली. त्रिशा ठोसर कोण आहे?
सर्वोत्कृष्ट बालकलाराचा ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार त्रिशा ठोसरला मिळाला. सोहळ्यात त्रिशाने परिधान केलेली मोती रंगाची साडी विशेष चर्चेत राहिली. अगदी निरागस हसऱ्या चेहऱ्याने पुरस्कार स्वीकारताना ती अतिशय गोंडस दिसत होती. ती व्यासपीठावर आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिचे अभिनंदन केले.
त्रिशाने नाळ २ चित्रपटाच भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयातील निरागसता पाहून सर्वच थक्क झाले. त्यामुळे तिला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. फक्त ५ वर्षांची असूनही ती आत्मविश्वासाने व्यासपीठावर आली. चालत असतानाच तिने हात जोडले. व्यासपीठावर येताच भवनमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष झाला.
जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग झाले होते, तेव्हा ती केवळ ३ वर्षांची होती. त्रिशा ठोसर ॲवॉर्ड घेतानाचे अनेक व्हिडिओ क्लिप समोर आले होते. २०२३ मद्ये रिलीज झालेला चित्रपट 'नाळ २'मध्ये दमदार काम केलं होतं.
पुरस्कार मिळाल्यानंतर त्रिशाने आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, खूप आनंद होत आहे. एका दिवसात तयारी केली होती.
त्रिशाने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली आहे. मांजरेकर यांचा चित्रपट 'पुन्हा शिवाजी राजे भोसले'मध्ये तिने एक महत्वाची भूमिका साकारली होती. तिला खरी ओळख सुधाकर रेड्डी यक्कांटी दिग्दर्शित 'नाळ २' मधून मिळाली होती. 'मानवत मर्डर्स' आणि 'पेट पुराण' चित्रपटातही तिने काम केलं आहे.