Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला, चांदीही स्वस्त

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,54,940 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.
Gold Price Today
Gold Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 7 सप्टेंबर रोजी दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

दिल्लीमध्ये सोन्याचा दर किती?

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 1,54,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,42,050 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

गेल्या आठवड्यात देशातील विविध शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,440 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 3,150 रुपयांपर्यंत स्वस्त झाला होता.

Gold Price Today
Sonia Gandhi Autobiography : सोनिया गांधींचे आत्मचरित्र आता 'हार्परकॉलिन्स इंडिया' करणार प्रकाशित

मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर

मुंबई आणि पुण्यातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. दोन्ही शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,890 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. 7 सप्टेंबरच्या सकाळी चांदीचा भाव कमी होऊन 2,49,900 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत. स्पॉट गोल्डचा भाव सुमारे 4,465.34 डॉलर प्रति औंस, तर स्पॉट सिल्व्हरचा भाव 66.72 डॉलर प्रति औंस आहे.

Gold Price Today
Delhi Building Collapse Video: दिल्ली हादरली! पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

जागतिक घडामोडींचाही परिणाम

देशांतर्गत सोन्या-चांदीचे दर केवळ स्थानिक बाजारातील मागणी-पुरवठ्यावर अवलंबून नसतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, डॉलरची स्थिती, जागतिक आर्थिक घडामोडी आणि इतर देशांतर्गत घटक यांचाही मौल्यवान धातूंच्या दरावर परिणाम होतो. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news