

यश मुख्य भूमिकेत असलेल्या Toxic चित्रपटासाठी त्याला सुमारे ५० कोटी फी दिल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. या चित्रपटातील नयनताराला भूमिकेसाठी किती कोटी मिळाले, तर रुक्मिणी वसंत, हुमा कुरैशी आणि तारा सुतारियास अनुक्रमे कमी फी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
Toxic movie star cast fees
धुरंधरनंतर चर्चा सुरु आहे ती टॉक्सिक चित्रपटाची. कन्नड सुपरस्टार यशच्या आगामी चित्रपटाने टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स'च्या कलाकारांच्या फीबददल चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीजर आधीच सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे, स्टारकास्टचे मानधन. यश, नयनतारासह इतर कलाकारांनी या चित्रपटासाठी किती कोटी घेतले? टॉक्सिक चित्रपटाचे बजेट ३०० कोटींहून अधिक आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यशने या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेतले. यश या चित्रपटाचा निर्माता आहे. कियारा आडवाणीने या चित्रपटात नादियाची भूमिका साकारलीय. तिला या भूमिकेसाठी १५ कोटी रुपयांची फी घेतली आहे. ती या चित्रपटाची महागडी अभिनेत्री आहे.
सुपरस्टार नयनताराने या चित्रपटासाठी गंगाची भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, १२ ते १८ कोटी रुपयांच्या आसपास आहे.
रुक्मिणी वसंतने मेलिसाची भूमिका साकारली होती. शांत आणि रुबाबदार अंदाजात ती दिसणार आहे. तिला ३ ते ५ कोटी रुपये फी मिळाली आहे.
हुमा कुरैशी एलिजाबेथच्या भूमिकेत दिसेल. तिचा रेट्रो लुक सध्या व्हायरल होत आहे. हुमाला २ ते ३ कोटी रुपये मिळाले आहेत.
तारा सुतारिया रेबेकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तारा सुतारियाने २ ते ३ कोटी रुपयांदरम्यान फी घेतली आहे.
हे आहेत कलाकार
टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, संयुक्ता मेनन, अक्षय ओबेरॉय, सुदेव नायर यासारखे स्टार्स आहेत.
कधी रिलीज होणार चित्रपट?
गीतू मोहनदास दिग्दर्शिच चित्रपट १९ मार्च, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
रिलीज होताच यशच्या टॉक्सिकला मिळाले ४८ मिलियन व्ह्यूज
दक्षिणेचा सुपरस्टार यश शेवटचा २०२२ मध्ये आलेल्या KGF २ मध्ये दिसला होता, ज्याने १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आणि ब्लॉकबस्टरचा ठरला. त्यानंतर फॅमनस यशच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता, यशचा बहुप्रतीक्षित टॉक्सिक हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.
"टॉक्सिक" च्या प्रदर्शनासाठी फक्त काही महिने शिल्लक असताना, निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्याला २४ तासात ४८ मिलियन व्ह्यूज मिळाले.
टीझरमध्ये यश खूपच सुंदर दिसत आहे. त्याच्या लूकवरून असे दिसून येते की, तो चित्रपटात माफियाची भूमिका साकारणार आहे. टीझर एका स्मशानात सुरू होतो आणि स्मशानातही संपतो. चित्रपटाचा टीझर खूपच शक्तिशाली आहे आणि त्याला यु-टयूबवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीज होताच, त्याने "धुरंधर"च्या टीझरलाही मागे टाकले. धुरंधरच्या टीजरला १६.८८ मिलियन व्ह्यूव्ज मिळाले होते. त्याची कमाई १,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.