Toxic 1st Day Box Office Collection: 'टॉक्सिक' यश... पहिल्याच दिवशी शतकी मजल; तब्बल ४ चित्रपटांना टाकलं मागं

Toxic 1st Day Box Office Collection
Toxic 1st Day Box Office Collectionpudhari
Published on
Updated on

Toxic 1st Day Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार यश चा नवीन क्राईक थ्रिलर टॉक्सिक चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा आहे. केजीएफच्या घवघवीत यशानंतर आता यशचा टक्सिक बॉक्स ऑफिसवर आग लावण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी धडाक्यात सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी टॉक्सिक हा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. त्याने फर्स्ट डे कलेक्शनमध्ये तब्बल ४ चित्रपटांना मागे टाकले.

Toxic 1st Day Box Office Collection
Actor Yash visits Dharmasthala | ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनापूर्वी यशने घेतले धर्मस्थळ येथे जाऊन दर्शन, फोटो आले समोर

पहिल्याच दिवशी कितीचा गल्ला?

बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती देणाऱ्या sacnilk.com नुसार टॉक्सिकने पहिल्या दिवशी १०१.१० कोटी निव्वळ कमाई केली आहे. तर या चित्रपटाचा ग्रॉस कमाईचा आकडा हा १२०.७५ कोटी रूपये आहे. वर्ल्डवाईड या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४०.७५ कोटींची कमाई केली आहे.

Toxic 1st Day Box Office Collection
Actor Yash : १४ मिलियन फॉलोअर्स तरीही यश फक्त एकाच व्यक्तीला करतो फॉलो; कोण आहे ती खास व्यक्ती?

यशच्या टॉक्सिकने कोणाला टाकलं मागं?

टॉक्सिक चित्रपट भारताच्या टॉप १० ओपनिंग करणाऱ्या चित्रपटात सामील झाला आहे. टॉक्सिक हा भारतात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने चार चित्रपटांना मागे टाकले आहे. टॉक्सिकने पहिल्या दिवशी कल्की २८९८ एडीपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर टॉक्सिकने सालार, आदिपुरूष आणि साहो या चित्रपटांना मागे टाकले आहे.

Toxic 1st Day Box Office Collection
Jana Nayagan Box Office Collection: 'जन नायकन'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; आतापर्यंत 10 चित्रपटांना टाकलं मागे, किती कोटी कमावले?

पहिल्या दिवशी दमदार कमाई करणारे चित्रपट

पुष्टा २ - १७४.९ कोटी

धुरंधर २ - १४५ कोटी

RRR - १३३ कोटी

बाहुबली २ - १२१ कोटी

केजीएफ चाप्टर २ - ११६ कोटी

टॉक्सिक - १०१.१० कोटी

कल्की २८९८ एडी - ९५.३ कोटी

सालार - ९०.७ कोटी

आदिपुरूष - ८६.७५ कोटी

साहो - ८४.७५ कोटी

Toxic 1st Day Box Office Collection
Yash Mahajan Air Force Selection: डोंबिवलीच्या यश महाजनची पहिल्याच प्रयत्नात भरारी; भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर

यशचा १०० क्लबमध्ये सलग दुसरा चित्रपट

यशचा टॉक्सिक हा सलग दुसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्या दिवशी १०० कोटी रूपयांची कमाई करून दिली आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ - २ ने पहिल्या दिवशी ११६ कोटी रूपयांची कमाई केली होती. केजीएफ बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला होता. टॉक्सिकचे देखील ऑपनिंग कलेक्शन यशचा अजून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार याचे संकेत देत आहे.

कोणत्या भाषेत किती कमाई?

कन्नड - २३.३० कोटी

तेलुगू - १६ कोटी

तमिळ - ५.५० कोटी

हिंदी - ५५ कोटी

मल्याळम - १.३० कोटी

यशचा टॉक्सिक हा चित्रपट गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला चांगले रिव्ह्यू देखील मिळाले असून यशसोबत या चित्रपटात हुमा कुरैशी, नयनतारा आणि कियारा अडवाणी हे कलाकार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news