

साऊथचा सुपरस्टार यशचा ॲक्शन-ड्रामा टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स चित्रपटाची रिलीज डेट बदलणार असल्याची माहिती समोर आलीय.
Actor Yash Toxic Fairy Tale Grown Ups release date latest update
मुंबई - साऊथ सुपरस्टार यश पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. KGF मालिकेनंतर त्याचा पुढील बिग प्रोजेक्ट ‘Toxic: A Fairy Tale for Grown-ups’ या चित्रपटाची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, निर्मात्यांनी त्या सर्व अफवांना पूर्णविराम देत अधिकृत घोषणा केली आहे की ‘टॉक्सिक’ ठरलेल्या तारखेलाच थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटाची डेट पुढे ढकलण्याबाबत मोठी चर्चा सुरु होती. आता चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी स्वत: निर्मात्याशी बातचीत करून स्पष्ट ट्विट केले की, चित्रपटाची रिलीज डेट अजिबात पुढे ढकलण्यात आलेली नाही.
प्रोडक्शन टीमशी बातचीतनंतर तरण आदर्श यांनी खुलासा केला की, चित्रपट आपल्या टाईमलाईनवर आहे. अप्रिल पासूनच पोस्ट-प्रोडक्शन आणि व्हीएफएक्सचे काम सुरू झाले आहे. त्याचवेळी यश मुंबईमध्ये रामायण चित्रपटाचे शूटिंग करत होता. सद्या चित्रपटाचे फायनल शूटिंग बंगळुरु मध्ये सुरु आहे आणि जानेवारी २०२६ पासून प्रमोशनचा फुल धमाका सुरू होईल.
प्रोडक्शन बॅनर केवीएन प्रोडक्शन्सने देखील सोशल मीडिया वर काऊंटडाऊन पोस्ट करून रिलीज डेट कन्फर्म केलीय. “१४० दिवस शिल्ली…त्याची अनियंत्रित उपस्थिती तुमच्या अस्तित्वाचे संकट बनेल. #ToxicTheMovie १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे!”
कधी रिलीज होणार चित्रपट?
१९ मार्च, २०२६ रोजी जगभरातील थिएटर्समध्ये हा चित्रपट रिलीज होईल. ठरलेल्या तारखेप्रमाणेच चित्रपट रिलीज केला जाणार आहे. हा दिवस प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे कारण केजीएफ २ नंतर यश तब्बल तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परततो आहे. गीतु मोहनदास दिग्दर्शित चित्रपट इंग्लिश, कन्नड भाषेत शूट झाले आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळमसह अनेक भाषेत हा चित्रपट रिलीज होईल.
या चित्रपटात यश एका अॅक्शन-पॅक्ड, ग्रे शेड असलेल्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग बंगळुरू, हैदराबाद आणि युरोपमध्ये करण्यात आले आहे.