

'शिर्डी के साईं बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आलीय. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने परिवाराने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
Sudhir Dalvi Hospitalized due to septic infection
मुंबई - हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या नाजूक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘शिर्डी के साईं बाबा’ या चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण देशभर ओळखले गेले. ते ८६ वर्षांचे असून त्यांना ८ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, वैद्यकीय उपचारांचा खर्च खूप मोठा असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी आता लोकांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं आहे. मागील काही काळापासून सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्याने गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत.
त्यांच्या उपचारांसाठी १५ लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. सुधीर दळवी यांच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रपरिवाराने चाहत्यांकडे आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. वृद्धापकाळामुळे आणि वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे उपचारांचा खर्च पेलणे कठीण होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या मदतीसाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे.
सुधीर दळवी यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. ‘शिर्डी के साईं बाबा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेला साईबाबांचा साधा, शांत आणि आध्यात्मिक चेहरा आजही प्रेक्षकांच्या मनात कोरला गेला आहे. त्याशिवाय ‘हम लोग’, ‘कबीर’, ‘रामायण’, ‘स्वामी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. 'जय संतोषी माँ' आणि 'रामायण'सारख्या टीव्ही मालिकांमध्ये तर सुधीर यांनी 'विधिलिखित', 'ऐकावं ते नवल', 'देवता', 'घर संसार' या मराठी चित्रपटांत काम केलंय.
कारणे
सेप्टिक इन्फेक्शन कोणत्याही प्रकारच्या संसर्गामुळे होऊ शकते, विशेषतः —
फुफ्फुसांचा संसर्ग (Pneumonia)
मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection)
पोटातील संसर्ग (Abdominal infection)
त्वचेवरील जखम किंवा भाजल्यावरचा संसर्ग