TMKOC Tappu: तारक मेहता का उलटा चश्मामध्ये परत येणार का? टप्पू फेम भव्य गांधी म्हणतो, मी परत येईन पण......

भव्य पुन्हा एकदा टप्पूच्या व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचे समोर येत होते
Entertainment
तारक मेहता का उलटा चश्माPudhari
Published on
Updated on

भव्य गांधीची ओळख आजही तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेचा टप्पू म्हणून आहे. मालिकेत जवळपास आठ वर्ष भव्य टप्पूच्या व्यक्तिरेखेत दिसला होता. त्यानंतर त्याने मालिका सोडली. त्याच्या अशा सोडण्याने मालिकेच्या फॅन्सनी नाराजीही व्यक्त केली होती. पण नुकताच भव्य पुन्हा एकदा टप्पूच्या व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचे समोर येत होते. बघता बघता ही बातमी सगळीकडे झळकू लागताच भव्यने समोर येऊन याविषयी अधिक सांगितले आहे. (Latest Entertainment News)

नेमके काय म्हणाला भव्य?

तारक मेहता.. या मालिकेत परत येण्याबाबत भव्य म्हणतो, की तो तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत दिसणार नाही. पुढे तो म्हणतो, लोकांचे इतके प्रेम बघून मी खुश झालो आहे. लोक इतके प्रेम करतात हे पाहणे खरंच आनंददायी आहे. पण खेदाची बाब ही आहे की मी मालिकेत परत येत नाहीये. एका मुलाखतीमध्ये मी सांगितले होते की मला तारक मेहता का उलटा चश्मामध्ये जायला आवडेल.

Entertainment
Bigg Boss 19: बिग बॉसच्या नव्या संभाव्य वाइल्ड कार्ड एंट्रीची का आहे इतकी चर्चा? आहे या लोकप्रिय ब्युटी प्रॉडक्ट ब्रॅंडची मालकीण

याचा अर्थ मला शोमध्ये माझ्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी जायचे आहे. कारण मी जिथे शिकलो आहे तिथून पहिल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी जाणे हे एक चक्र पूर्ण होण्यासारखे आहे.’

Entertainment
Actor in Dhurandhar: या अभिनेत्याला ओळखले का? रणवीरच्या धुरंधरमध्ये साकारतो आहे महत्त्वाची भूमिका

अफवांवर अशी होती भव्यची प्रतिक्रिया

भव्य म्हणतो, या अफवा आल्यापासून मी खूप हसतो आहे. यावरच्या प्रतिक्रियाही पाहिल्या. मी सध्या तीन सिनेमे शूट केले आहेत. पुढच्या वर्षी चौथ्या सिनेमाच्या तयारीला लागतो आहे. मी खूप प्रयत्न केले आहेत. अशावेळी मी मालिकेत परत जाण्याविषयी विचारही करू शकत नाही. लोक आठ वर्षांनंतरही माझ्यावर तितकेच प्रेम करतात हे पाहून आनंद वाटला. हा केवळ त्यांचा आशीर्वाद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news