

राम गोपाल वर्मा अलीकडे त्याच्या सिनेमामुळे कमी आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आताही त्याच्या व्यक्तव्यामुळे त्याने नेटीझन्सचा चांगलाच रोष ओढवून घेतला आहे. शिक्षक दिनादिवशी राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्ट शेयर केली ज्यात ते म्हणतात, मी जे काही बनलो, जे काही सिनेमे बनवले त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वाला नमन. यामध्ये अमिताभ बच्चन, स्टीव्हन स्पिलबर्ग, अॅन रॅन्ड, ब्रुस ली, श्रीदेवी आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. शिक्षक दिवसाच्या शुभेच्छा.’ (latest Entertainment News)
आता या पोस्ट नेटीझन्सनी तोंडसुख घेतले नसते तर नवलच. एकजन त्यांच्या पोस्टवर कमेंट करताना म्हणतो, दाऊदच्या शिक्षकांना पण गर्व असेल कारण एक शिक्षक केवळ जगात सगळ्यात वर राहायला शिकवत नाही तर तर कधी कधी गुन्हेगारी जगात पण तग धरायला शिकवतो.’ तर दूसरा विचारतो, तुम्ही दाऊद इब्राहीमपासून काय शिकलात?’
तर एकाने त्याला खोचक सल्ला देत लिहिले आहे की यात ओसामा बिन लादेनचे नावही जोडायचे होते. दूसरा म्हणतो, तुम्ही दाऊदला प्रेरणास्थान सांगून नक्कीच मस्करी करत आहात.
2021 मध्ये राम गोपाल वर्माने डी कंपनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये दाऊदच्या गुन्हेगारी जगताच्या खऱ्या घटनांवर आधारित अनेक प्रसंग होते. या सिनेमात अजय देवगण, मोहनलाल, विवेक ओबेरॉय, मनीषा कोइराला, अंतरा माळी, सीमा विश्वास यांच्या मुख्य भूमिका होत्या.
एका मुलाखतीमध्ये राम गोपाल वर्माने सांगितले होते की त्यांचे करियर दाऊदची कृपा आहे. त्यांनी सांगितले की गँगस्टर सिनेमाने त्याला यश दिले आहे.