Tishaa Kumar Died |निर्माते कृष्ण कुमार यांच्या मुलीचे कॅन्सरने वयाच्या २१ व्या वर्षी निधन

निर्माते कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचे कॅन्सरने निधन
Tishaa Kumar died due to cancer
तिशा कुमार हिचे कॅन्सरने निधन झाले आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते, निर्माते आणि टी-सीरीजचे को-ओनर कृष्ण कुमार यांच्या मुलीचे निधन झाले आहे. तीशा कुमार केवळ २१ वर्षांची होती आणि कॅन्सरने पीडित होती. कॅन्सरच्या उपचारासाठी तिशाला मुंबईहून जर्मनीमध्ये नेण्यात आलं होतं. तेथील एका रुग्णालयात तिचे निधन झाले. (Tishaa Kumar Died)

Tishaa Kumar died due to cancer
केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर

टी-सीरीजच्या प्रवक्त्याने तिशाबद्दल काय सांगितले?

टी-सीरीजचे प्रवक्त्याने तिशाच्या निधनाची पुष्टी केली आहे. एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करून म्हटलंय- "कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचा दीर्घकाळ आजाराशी संघर्ष केल्यानंतर काल निधन झाले आहे. या परिवारासाठी कठीण वेळ आहे, आम्ही आवाहन करतो की, परिवाराच्या प्रायव्हेसीचा सन्मान केला जावा."

Tishaa Kumar died due to cancer
Malaika Arora : अर्जुन कपूरनंतर मलायका मिस्ट्री मॅनसोबत करतेय एन्जॉय

गुलशन कुमारचा लहान भाऊ आहे कृष्ण कुमार

कृष्ण कुमार म्युझिक कंपनी टी सीरीजचे दिवंगत फाऊंडर आणि चित्रपट निर्माते गुलशन कुमारचे छोटे भाऊ आहेत. कृष्ण कुमारने ९० च्या दशकात चित्रपटांमध्ये अभिनेते म्हणून काम केलं होतं. कृष्ण कुमारने आजा मेरी जान से बॉलीवूडमध्ये १९९३ मध्ये डेब्यू केला होता. पुढे कसम तेरी कसम, शबनम यासारख्या चित्रपटामध्ये ते दिसले. पण त्यांना बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली नाही.

Tishaa Kumar died due to cancer
एकापेक्षा मराठी चित्रपटांची प्रतीक्षा; अफलातून कहाणींची धमाल

१९९५ मध्ये त्यांचा चित्रपट सनम बेवफा रिलीज झाला. या चित्रपटाने कृष्ण कुमार यांना हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवून दिली. अखेरीस कृष्ण कुमार २००० मध्ये चित्रपट पापा दी ग्रेटमध्ये दिसले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर कृष्ण कुमार अभिनयापासून दूर गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news