Malaika Arora photo
Malaika Arora : अर्जुन कपूरनंतर मलायका मिस्ट्री मॅनसोबत करतेय एन्जॉयMalaika Arora instagram

Malaika Arora : अर्जुन कपूरनंतर मलायका मिस्ट्री मॅनसोबत करतेय एन्जॉय

अर्जुन कपूरनंतर मलायका मिस्ट्री मॅनसोबत करतेय एन्जॉय
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora ) ही सध्या स्पेनमध्ये सुट्टघांचा आनंद लुटत आहे. याचवेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू आहेत.

image-fallback
अर्जुन कपूरनंतर मलायकालाही कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनंतर मलायकाच्या ( Malaika Arora )आयुष्यात पुन्हा एकदा कोणीतरी आल्याचे सांगितले जात आहे. अर्जुनशी ब्रेकअप झाल्याची माहितीही गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. मलायका कोणाला डेट करत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. स्पेनमध्ये ती तेथील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेत आहे; पण ती त्या ठिकाणी एकटी नाही आहे. तिच्यासोबत अजून कोणीतरी असल्याचा काहींचा अंदाज आहे.

Malaika Arora photo
मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांचा स्विमिंग पूलमध्‍ये व्यायाम❤️ (Video)
admin

५० वर्षीय मलायकाने चार फोटो कोलाज करून तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केले आहेत. यात एक व्यक्ती दिसत आहे; पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. हा फोटो पाहिल्यानंतर मलायका पुन्हा एकदा कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मलायका स्पेनमध्ये कोणासोबत आहे, याचा खुलासा झाला नसल्याने वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत.

Malaika Arora photo
मी म्हातारी तरूण मुलाला डेट करतेय : मलायका अरोरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news