

आगामी चित्रपट ‘बागी ४’चे पहिले गाणे ‘गुजारा’ रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ माजी मिस युनिव्हर्ससोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
Baghi 4 First Song Guzaara Out
मुंबई : टायगर श्रॉफ आणि संजय दत्त स्टारर ॲक्शनपट ‘बागी ४’ चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू मुख्य भूमिकेत असून हे एक रोमँटिक ट्रॅक आहे. हे गाणे पंजाबी गायक सरताजचे गाणे ‘तेरे बिना ना गुजारा’चे रीमेक आहे.
याआधीही जेव्हा गायक जोश ब्रारने त्याचे रीमेक बनवले होते तेव्हाही चर्चेत आले होते. आता जोश ब्रारने ‘बागी ४’ मध्ये आपला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल पंजाबीच्या जागी हिंदीमध्ये आहेत. गाण्यात टायगर-हरनाज संधू रोमान्स करताना दिसत आहेत.
याआधी ‘बागी ४’ चा टीजर जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘ॲनिमल’ आणि ‘मार्को’सारखे अॅक्शन पाहायला मिळाले होते. काही मिनिटाच्या टीजरमध्ये केवळ रक्तपातही दिसत होते. ‘बागी ४’ मध्ये टायगर श्रॉफ सोबत संजय दत्त, हरनाज कौर संधू, सोनम बाजवा सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. चित्रपटाचे दिग्दर्शन ए हर्षाने केले असून ‘बागी ४’ चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.
२०१६ मध्ये पहिल्यांदा ‘बागी’ चित्रपट रिलीज झाला बोता. त्यानंतर त्याच्या तीन फ्रेंचायझी रिलीज झाल्या. आता चौथा भाग देखील येतोय. पहिल्या आणि तिसऱ्या चित्रपटात श्रद्धा कपूर होती. दुसऱ्या भागात दिशा पटानी तर आगामी फ्रेंचायझी मध्ये में हरनाज संधू-सोनम बाजवा दिसतील.