

Coolie Box Office Collection updates
मुंबई - पहिल्या आठवड्यात 'कुली'ने 'वॉर २' ला मागे टाकत ३२० कोटी कमावले आहेत. लोकेश कनगराज यांच्या कुलीने आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर ४ कोटी कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला. रजनीकांत आणि लोकेश कनागराज यांचा 'कुली: द पॉवरहाऊस' हा चित्रपट हिंदीमध्ये जबरदस्त कमाई करत आहे.
कुलीने भारतात चार दिवसांत ओपनिंग वीकेंडमध्ये १९४.२५ कोटी (एकूण २३३ कोटी) कमाई केली. आज सोमवारी भारतात २०० कोटींच्या क्लबमध्ये चित्रपट समाविष्ट होईल, असे म्हटले जात आहे. कुलीची परदेशातील कमाईही दमदार आहे. उत्तर अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये शानदार ओपनिंग केलं आहे. रविवारपर्यंत, या चित्रपटाने वर्ल्डवाईड १६० कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक कमाई केली आहे. चार दिवसांनंतर जगभरात त्याची एकूण कमाई ३२० कोटी रु. झाली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘कुली’चा प्रवास पाहिला तर पहिल्या दिवशी ६५ कोटींचे दमदार ओपनिंग केले होते. दुसऱ्या दिवशी ५४.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी ३५ कोटींची कमाई केली. रजनीकांतच्या ‘कुली’ने आपल्या दमदार कमाईसोबत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील तोडले. ‘कुली’ मध्ये अक्किनेनी नागार्जुन, आमिर खान, श्रुती हासन, उपेंद्र राव, पूजा हेगडे, सत्यराज, रेबा मोनिका जॉन देखील मुख्य भूमिकेत आहेत.
कुलीने ऋतिक रोशन - ज्युनियर एनटीआरच्या वॉर २ चित्रपटाला मागे टाकले आहे. 'वॉर २' ने ३ दिवसांत वर्ल्डवाईड २१५ कोटी रुपये मिळवले. तर 'कुली'ने वर्ल्डवाईड ३२० कोटी कमावून वॉर २ ला मागे टाकले. 'वॉर २' कलेक्शन आतापर्यंत १५८ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. तर कुली १७५ कोटींच्या वर पोहोचले आहे.