

मालिका हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादी मालिका सुरू झाली की त्याचे कथानक, कलाकार यांच्याशी प्रेक्षकांचा एक भावनिक बंध निर्माण होतात. या मालिका निरोप घेतात तेव्हा प्रेक्षकांनाच नव्हे तर कलाकारांनाही एक हुरहूर लागते. अशीच एक मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. (Latest Entertainment News)
स्टार प्रवाह वाहिनीवर एक वर्षापूर्वीच सुरू झालेली 'थोड तुझ थोडं माझं' या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होतो आहे. यावेळी मालिकेत आभाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री साक्षी गुंडे हिने खास पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने मालिकेतील आठवणींना उजाळा दिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, उद्या आमच्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होतोय त्या निमित्ताने...
ही माझी पहिली मालिका आणि पहिल्याच मालिकेत मिळालेली छान भूमिका आणि एवढी सुंदर टीम. या प्रोजेक्टच्या निमित्ताने कस लावून काम करणारी आणि कॅमेर्यामागे तेवढीच धमाल करणारी माणसं मी पाहिली. मी एक-दीड महिना उशिरा जाॅईन होऊनसुद्धा यांनी कधीच मला वेगळं वाटू दिलं नाही. एवढी मजा, एवढी मस्ती, माझे इतके लाड, एवढं प्रेम पुन्हा कुठल्या सेटवर मिळेल की नाही माहित नाही, पण एखादं चांगलं काम नक्कीच माझी वाट पाहत असेल. कुछ पाने के लिए कुछ खोना जरुर पडता है। या कामासाठी मी अपर्णामॅम आणि अतुलसरांची कायम ऋणी राहीन. अर्थात हा पूर्णविराम नाही, या माणसांशी पुढे अनेक प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने किंवा सहज भेटीगाठी होत राहतील, पण त्यात 'थोडं तुझं आणि थोडं माझं' कायम खास राहील!
थोडं तुझ थोडं माझे ही मालिका जून 2024 मध्ये प्रसारित झाली होती. यात समीरदेशपांडे आणि शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मलिकेतील तेजस - मानसीची जोडी सगळ्यांना आवडली होती.