The Traitors 2 Winner: 'धुरंदर'ची ही डान्सर बनली विजेती, कोण आहे रिदा थराना जिने अखेरच्या क्षणी गेम पलटवला?

The Traitors 2 Winner: 'धुरंदर'ची ही डान्सर बनली विजेती, कोण आहे रिदा थराना जिने अखेरच्या क्षणी गेम पलटवला?
The Traitors 2 Winner
The Traitors 2 Winner
Published on
Updated on

करण जौहरच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना 3 सप्टेंबर रोजी पार पडला. या सीझनमध्ये अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा आणि रिदा थराना यांनी बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. दोघींनी मिळून तब्बल 66 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. विशेष म्हणजे, फायनलपर्यंत पोहोचलेल्या दोन्ही ट्रेटर्सनी शेवटच्या टप्प्यापर्यंत एकमेकींवर विश्वास ठेवत गेममध्ये आपली पकड कायम ठेवली.

संपूर्ण सीझनमध्ये क्रिस्टल आणि रिदा यांनी अत्यंत सावधपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने खेळ केला. एकामागून एक स्पर्धकांना गेममधून बाहेर करत त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या. त्यांच्या रणनीतीचा अंदाज इतर खेळाडूंना शेवटपर्यंत बांधता आला नाही. विशेष म्हणजे, क्रिस्टलकडे रिदाला अंतिम टप्प्यात बाहेर करून एकट्याने संपूर्ण रक्कम जिंकण्याची संधी होती. मात्र, तिने तसा निर्णय घेतला नाही आणि रिदासोबत भागीदारी कायम ठेवली.

मल्लिका शेरावतही या सीझनमध्ये सहभागी झाली होती. मात्र, क्रिस्टलच्या रणनीतीसमोर तिचा निभाव लागला नाही आणि तिला फायनलच्या आधीच गेममधून बाहेर पडावे लागले.

The Traitors 2 Winner
Javed Akhtar on Religion: लहानपणी फरहानने विचारलं, 'आपण मुस्लिम आहोत का?', जावेद अख्तरांचं उत्तर ऐकून व्हाल थक्क!

फायनलपूर्वी मल्लिकाचा गेम संपवला

अंतिम मिशनला सुरुवात होण्यापूर्वीच क्रिस्टल आणि रिदाने मल्लिका शेरावतला गेममधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. तिच्या एक्झिटनंतर फायनलमध्ये दलीप ताहिल, शालिनी पासी, साहिल सलाथिया, रिदा थराना आणि क्रिस्टल डिसूजा हे पाच जण उरले. यानंतर अंतिम मिशन पार पडले. या टास्कमध्ये स्पर्धकांना उंटांवर ठेवलेल्या बॅगमधून सोन्याच्या विटा शोधून त्या जमा करायच्या होत्या. मिशन सुरू होण्यापूर्वी प्राइज पूलमध्ये 48 लाख 40 हजार रुपये होते. फायनल मिशनमध्ये स्पर्धकांनी आणखी 17 लाख 60 हजार रुपये जमा केले. त्यामुळे शोच्या अखेरीस एकूण बक्षीस रक्कम 66 लाख रुपयांवर पोहोचली.

क्रिस्टलने दलीप ताहिलविरोधात खेळली चाल

फायनल मिशननंतर ‘सर्कल ऑफ शक’चा टप्पा आला. यावेळी साहिल सलाथिया आणि दलीप ताहिल यांच्यात जोरदार वाद झाला. दुसरीकडे, दलीप यांनी इतर स्पर्धकांबाबत केलेल्या काही वक्तव्यांवर शालिनी पासीनेही नाराजी व्यक्त केली. ही परिस्थिती लक्षात घेत क्रिस्टलने इतर खेळाडूंना दलीप यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी तयार केले. तिच्या रणनीतीचा परिणाम झाला आणि दलीप ताहिल यांना गेममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, शोच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचूनही दलीप यांना गेममधील आपली खरी ओळख उघड करण्याची संधी मिळाली नाही.

The Traitors 2 Winner
Padmavati Jauhar Controversy: मी सती, पद्मावतीला भ्याड म्हटलं नव्हतं... जौहरवरून पुन्हा वादंग, स्वरा जाम भडकली, निर्भयाचं दिलं उदाहरण

शेवटच्या गेममध्ये ‘शक’ आणि ‘ट्रस्ट’चा खेळ

दलीप यांच्या एक्झिटनंतर अंतिम चार खेळाडू निश्चित झाले. यामध्ये क्रिस्टल डिसूजा, रिदा थराना, शालिनी पासी आणि साहिल सलाथिया यांचा समावेश होता. यानंतर विजेते ठरवण्यासाठी एक खास फायनल गेम खेळवण्यात आला. या गेममध्ये प्रत्येक स्पर्धकासमोर एक बॉक्स ठेवण्यात आला होता. त्यांना त्यातून ‘शक’ किंवा ‘ट्रस्ट’ यापैकी एक पर्याय निवडायचा होता.

जर चौघांनीही ‘ट्रस्ट’ निवडले असते, तर गेम तिथेच संपला असता. मात्र, एका खेळाडूने जरी ‘शक’ निवडले, तरी पुढील टप्प्यात प्रवेश मिळणार होता आणि त्यानंतर एका स्पर्धकाला मतदानाद्वारे बाहेर केले जाणार होते. पहिल्याच फेरीत चौघांनी ‘शक’ हा पर्याय निवडला. त्यानंतर झालेल्या मतदानात साहिल सलाथिया यांना गेममधून बाहेर करण्यात आले.

दुसऱ्या फेरीत क्रिस्टलचा मास्टरस्ट्रोक

फायनलच्या दुसऱ्या फेरीत क्रिस्टल डिसूजाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. यावेळी तिने ‘शक’ऐवजी ‘ट्रस्ट’ची निवड केली. तिच्यासोबत रिदानेही ‘ट्रस्ट’ निवडल्याने दोघींची भूमिका स्पष्ट झाली. मात्र, शालिनी पासीने पुन्हा एकदा ‘शक’चा पर्याय निवडला. त्यामुळे गेमचा आणखी एक मतदानाचा टप्पा सुरू झाला. या फेरीत शालिनीने रिदाच्या विरोधात मतदान केले. दुसरीकडे, क्रिस्टल आणि रिदा या दोघींनी शालिनीच्या विरोधात मत दिले.

दोन विरुद्ध एक अशा मतांमुळे शालिनी पासीचा गेम संपला आणि फायनलमध्ये फक्त क्रिस्टल आणि रिदा या दोघी उरल्या. अखेर दोन्ही खेळाडूंनी एकमेकींना साथ देत ‘द ट्रेटर्स 2’चे विजेतेपद पटकावले. क्रिस्टलच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे फायनलचा संपूर्ण खेळच बदलला. रिदाला बाहेर करण्याऐवजी तिच्यावर विश्वास दाखवत क्रिस्टलने भागीदारी कायम ठेवली आणि दोघींनी मिळून 66 लाख रुपयांच्या बक्षिसावर आपला हक्क मिळवला.

कोण आहे रिदा थराना?

रिदाने तिच्या करिअरची सुरुवात होस्ट आणि सूत्रसंचालक म्हणून केली. सुरुवातीच्या काळात तिने छोटी कामे केली. कठोर परिश्रम आणि तिच्या सोशल मीडियावरील कंटेटमुळे, तिने डिजिटल विश्वात दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. रिदाने कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण केले आहे. रिदा थरना या मूळच्या कर्नाटकातील कोडगू येथील असून, ती सध्या बंगळूरुस्थित कंटेंट क्रिएटर, मॉडेल, अँकर आहे. तिचा जन्म कुर्गमधील पोलिबेटा येथे झाला आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ती बंगळूरुला आली. रिदाने गार्डन सिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये पदवी मिळवली.

सोशल मीडियावर आपल्या कंटेंटमुळे प्रसिद्ध होण्यापूर्वी, तिने मॉडेल आणि अँकर म्हणून काम केले. ती एक फ्रीलान्स अँकर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे. त्यांच्या सार्वजनिक प्रोफाइलमध्ये असेही नमूद आहे की त्यांनी शेकडो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

तर क्रिस्टल डिसुझा टीव्ही अभिनेत्री असून ती धुरंधर या चित्रपटात शरारत या गाण्यात डान्स केला होता. यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news