

Swara Bhaskar Controversy: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या जौहर किंवा सती जाण्याच्या वक्तव्यावरून ती पुन्हा वादात सापडली आहे. सोशल मीडियावर तिची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये दावा केला जात आहे की स्वराने राणी पद्मावती आणि जौहर करणाऱ्या दुसऱ्या महिलांना भ्याड म्हटलं होतं. आता या संपूर्ण वादावर स्वराची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.
स्वरा भास्करने तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अन् भाषांतर केलं असं सांगितलं. तिचे वक्तव्य तोडून मोडून सादर करून एक खोटी गोष्ट पसरवली जात आहे. स्वरा भास्कर म्हणाली की, मी काही तरी बोलले होते. ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने अनुवादित करण्यात येत आहे.
स्वराने तिने कधीही राणी पद्मावती या भ्याड होत्या. किंवा महालातील इतर दुसऱ्या राण्या ज्यांनी जौहर केला त्या भ्याड होत्या असं म्हटलं नाही. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की मी कधीही राणी पद्मावती यांना भ्याड म्हटलं नाही.
स्वराने आपल्या व्हिडिओत आपण जे काही बोललो त्याचा हिंदीमध्ये काय अर्थ होतो हे सांगितलं. तिने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर देखील आगपाखड केली. तिने कोणाला जर भाषा समजत नसेल तर त्यांनी आधी विचारलं पाहिजे. माहिती करून घेतलं पाहिजे की खरं काय आहे. काही माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने गोष्टी पसरवणे योग्य नाही.
स्वरा म्हणाली की जे लोक मला शिव्या देऊ इच्छितात त्यांनी द्याव्यात मात्र योग्य गोष्टीवर लक्ष द्या. स्वराने पद्मावत चित्रपटाचा क्लायमेक्स पाहताना तिला काय वाटलं हे सांगितलं होतं.
त्यावेळी त्यांनी चित्रपटाचा शेवट पाहताना मला वाटलं होतं की जर देव न करो पण ती स्वतः बलात्काराची शिकार झाली असती तर कदाचित मी स्वतःचा जीव दिला नाही या गोष्टीवर मला भ्याडपणा वाटला असता.
स्वराने आपले म्हणणे समजून सांगताना म्हटलं की, ज्यावेळी मी चित्रपटाचा क्लायमेक्स पाहत होते त्यावेळी मला वाटलं की देव न करो पण जर मी बलात्काराची शिकार झाले असते आणि त्यानंतर मी स्वतःला मारलं नसतं तर मी स्वतःला भित्री समजले असते. स्वराने आपण अशा एका समाजात राहतोय जिथं बलात्कार संस्कृती वेगाने फोफावत आहे.
स्वराने दिल्ली एनसीआरमध्ये एका मुलीसोबत कथितरित्या ४७ किलोमीटर पर्यंत बलात्कार करण्यात आल्याचा उल्लेख केला. अशा घटना आणि महिलांची स्थिती पाहून चित्रपट समाजाला कोणता संदेश देत आहेत.
तिने पद्मावत चित्रपटावरून प्रश्न विचारला की, 'आपल्याला असे चित्रपट तयार करायला हवेत का ज्या चित्रपटाच्यामाध्यमातून एका महिलेची शारीरिक पवित्रता ही तिच्या आयुष्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे असा संदेश जात आहे. स्वरा पुढे विचारते की आपल्याला बलात्कार पीडितांना असा संदेश दिला पाहिजे का की तुम्ही मेला असता तर बरं झालं असतं? तू जीवंत राहिलीस ही वाईट गोष्ट आहे?
स्वराने एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यानंतर तिचे आयुष्य संपुष्टात येतं का असा प्रश्न देखील विचारला. तिने निर्भयाचा उल्लेख करत तिने शेवटच्या श्वासापर्यंत सहा लोकांशी लढाई लढली होती. महिलांच्या जगण्याच्या इच्छेला कधी कमी समजलं जाऊ नये असं देखील मत व्यक्त केलं.