

‘द फोक आख्यान’च्या धडाकेबाज संगीताने महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या संगीतकारांची टीम आता पहिल्यांदा मराठी चित्रपटाला संगीत देत आहे. लोकसंगीत आणि आधुनिक फ्यूजनच्या मिश्रणातून बनलेलं त्यांचं संगीत सिनेरसिकांना नवा अनुभव देणार आहे.
Kranti Jyoti Vidyalay Marathi Madhyam The Folk Aakhyan music
मुंबई - ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता आणखी एक नवी अपडेट पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेंच्या नवा प्रोजेक्टची घोषणा करण्यात आलीय. आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट त्यांनी शेअर केलीय.
लोकरंगात गाजलेलं ‘द फोक आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठसकेबाज सादरीकरणाने आधीच राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. लोककलेला मांडण्याची अनोखी शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटातील गाणीही दमदार असणार आहेत. खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केली आहेत. गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे असून संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथांचा मिलाप प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
काय म्हणाले दिग्दर्शक हेमंत ढोमे?
“क्रांतिज्योतीसाठी ‘द फोक आख्यान’ची निवड केली. कारण लोककलेविषयीची समज, ऊर्जा, त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोण हवा होता.”
कधी रिलीज होणार क्रांतिज्योती विद्यालय?
येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार कलाकार सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असणार आहेत. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.