

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लेकीचं नाव सरायाह असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थपूर्ण आणि युनिक नावामुळे फॅन्सनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. “देवाची कृपा आणि देणगी” असा भाव असलेलं हे नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Siddharth Malhotra-Kiara Advani Daughters Name baby girl name revealed
मुंबई - अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या बाळाचे युनिक नाव ठेवले आहे. तिच्या जन्मानंतर ४ महिन्यांनी तिच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे. बाळाच्या नावाचा अर्थही वेगळा आहे.
बॉलिवूडचे लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचे कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता दिसते. त्यांचे लग्न, त्यांचे प्रोजेक्ट्स आणि त्यांचे खास क्षण सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता या स्टार कपलबद्दल आणखी एक खास बातमी समोर आली आहे, ज्यामुळे फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या लेकीचं नाव समोर आलं असून ते नाव जितकं युनिक, तितकंच अर्थपूर्ण आहे.
कियारा आडवाणीने १५ जुलैला मुंबईतील एका रुग्णालयात आपल्या मुलीचे स्वागत केले आणि एक दिवसानंतर भावूक इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आगमनाची घोषणा केली.
चार महिन्यांनंतर या कपलने अखेरीस आपल्या मुलीचे नाव सांगितले आहेत. कियाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घोषणा करत लिहिले की, 'आमच्या प्रार्थनेमुळे, आमच्या कुशीत, आमचा दिव्य आशीर्वाद, आमची राजकुमारी, सरायाह मल्होत्रा.'
हिरव्या रंगाच्या बॅकग्राउंडवर बेबी सरायाहच्या चिमुकल्या पावलांची ही पोस्ट व्हायरल झाली. अनेक सेलिब्रिटींनी, फॅन्सनी या पोस्टवर कॉमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाला सुरुवाते केली. वरुण धवनने हार्ट इमोजीचा एक सीरीज पोस्ट केली. तर डिझायनर मनीष मल्होत्राने जेखील प्रतिक्रिया दिलीय.
बाळाचे काय ठेवलं नाव?
रिपोर्टनुसार, 'सरायाह' नाव हिब्रू नाव सारै पासून घेण्यात आलं. याचा अर्थ आहे राजकुमारी. कियारा - सिद्धार्थने सरायाह हे अनोखे नाव ठेवले आहे.