Thamma Advanced Booking | तिकीट बारीवरचे २४ तास, 'थामा'चे तुफान ॲडव्हान्स बुकिंग; आयुष्मान खुराना-रश्मिकाची जबरदस्त क्रेझ

तिकीट बारीवरचे २४ तास, 'थामा'चे तुफान ॲडव्हान्स बुकिंग; आयुष्मान खुराना-रश्मिकाची जबरदस्त क्रेझ
image of thamma poster
Thamma Advanced Booking updates x account
Published on
Updated on

मुंबई - 'थामा'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तुफान तिकिट विक्री केली आहे. २४ तासात विक्री झालेल्या तिकिटांमुळे आयुष्मान खुराना-रश्मिकाच्या चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे. आयुष्मान खुराना - रश्मिका मंदाना स्टारर 'थामा'ने ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. देशभरात थामाचे ५ हजार तिकीटे विक्री करण्यात आली आहेत.

आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा हॉरर चित्रपट 'थामा' २१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटाचे बझ आधी जबरदस्त बनले आहे. 'थामा' ने आपल्या ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी काही तासातच ४००० हजारहून अधिक तिकिटे विक्री केली आहेत. एकूण प्री-सेल ५ हजारहून अधिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ॲडव्हान्स बुकिंग पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटाला शानदार ओपनिंग मिळू शकते.

थामाची ॲडव्हास बुकिंगमध्ये धूम

वॅम्पायर कॉमेडी ड्रामा दिवाळीच्या पुढील दिवशी रिलीज होणार आहे. ज्यामुळे चित्रपटाला फायदा मिळेल. आयुष्मान खुराना- रश्मिका मंदानाची 'थामा'ने सुरुवात केल्यानंतर काही तासातच ६ हजारहून अधिक तिकिट विक्री करण्यात आली.

पहिल्या दिवशी एकूण तिकीटांची विक्री १२ हजारचा आकडा पार करत झाली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित थामाचे ॲडव्हान्स बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे.

image of thamma poster
kyunki saas bhi kabhi bahu thi vs Anupama | 'क्योंकि सास भी कभी बहू थी'ची 'अनुपमा'शी स्पर्धा? स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

थामाला मिळणार दिवाळी सुट्ट्यांचा फायदा

आयुष्मान - रश्मिका स्टारर हॉरर-कॉमेडी जॉनर आणि मॅडॉक फिल्म्स हॉरर कॉमेडी युनिव्हर्स (MHCU) चित्रपट हिट ठरेल. 'थामा'च्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये नंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, सुरुवातीला २०-३० कोटींची कमाई होऊ शकते.

image of thamma poster
The Taj Story Trailer | मंदिर की मकबरा? द ताज स्टोरीच्या ट्रेलरमधून वादाला फुटले तोंड, उघडणार २२ बंद खोल्यांचे रहस्य

थामाचे कलाकार

आदित्य सरपोतदार द्वारा दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स द्वारा निर्मित 'थामा'ला २ तास ३० मिनिटांच्या अवधी सोबत CBFC द्वारा U/A प्रमाणित करण्यात आलं आहे. चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news