kyunki saas bhi kabhi bahu thi vs Anupama | 'क्योंकि सास भी कभी बहू थी'ची 'अनुपमा'शी स्पर्धा? स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

kyunki saas bhi kabhi bahu thi vs Anupama | 'क्योंकि सास भी कभी बहू थी'ची 'अनुपमा'शी स्पर्धा? स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या
kyunki saas bhi kabhi bahu thi -Anupama
kyunki saas bhi kabhi bahu thi vs AnupamaInstagram
Published on
Updated on

smriti irani on kyunki saas bhi kabhi bahu thi vs Anupama

मुंबई - अभिनेत्री, राजकीय नेत्या आणि आता पुन्हा अभिनय क्षेत्रात आलेल्या स्मृती ईरानी यांची चर्चा होताना दिसतेय. काही दिवसांपासून मालिका अनुपमाची तुलना क्योंकि सास भी कभी बहू (Kyuki Saas Bhi Kabhi bahu thi) केली जात आहे. आता या प्रकरणावर स्मृती ईरानी यांनी काय म्हटलंय पाहुया.

अभिनेत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी सध्या मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' रीबूटमध्ये तुलसी विरानीच्या भूमिकेत आहे. त्यांच्या शोची तुलना टीआरपी प्रकरणात रूपाली गांगुलीची हिट सीरीज 'अनुपमा'शी केली जात होती. आता स्मृती ईरानी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत स्मृती ईरानी यांनी या तुलना फेटाळत म्हटले आहे की- 'क्यों की'चा वारसा २५ वर्षांनंतरही अतुलनीय आहे.'

kyunki saas bhi kabhi bahu thi -Anupama
Bihar Election Khesari Lal Yadav | "भोजपुरी भइया दिल जीत लिहले बाडन!", खेसारी लाल यादव बिहार निवडणुकीच्या रिंगणात

२५ वर्षे आठवणीत आहे क्यों की मालिका

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अनुपमा आणि त्याची मुख्य कलाकार रूपाली गांगुलीशी सातत्यान तुलना केल्यानंतर कसे वाटते? यावर ईरानी म्हणाल्या, "मी त्यांना स्पर्धक म्हणून पाहत नाही. जेव्हा टीआरपीमध्ये ३० व्या क्रमांकावर पोहोचू शकता, तेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धक होऊ शकता. आम्ही २५ वर्षांपासून तिथे होतो. जर तुमच्यात २५ वर्षांपर्यंत आठवण ठेवण्याची क्षमता आहे, तर आम्ही प्रतिस्पर्धेच्या गोष्टी करु."

kyunki saas bhi kabhi bahu thi -Anupama
Kantara Chapter 1 collection | ‘कांतारा: चॅप्टर १’ ने उडवला बॉक्स ऑफिसचा बार; होम्बले फिल्म्सचा मोठा विक्रम

क्योंकिचा दबदबा कायम

जितकी वर्षे क्योंकिची लोकप्रियता होती, तितकीच आजही लोकप्रियता कायम आहे. सातत्याने आठ वर्ष भारतीय टेलीव्हिजनवर या मालिकेचा दबदबा राहिला आहे. आपल्या शो बद्दल बोलताना ईरानी म्हणाल्या, क्योंकि मनोरंजन उद्योगात एक मानक बनले आहे. "जर तुम्ही तीन वेळा खासदार राहिला आहात, एक दशकापासून कॅबिनेट मंत्री आहात, २५ वर्षांपासून भाजपाचे सदस्य आहात आणि जर तुम्ही प्रतिस्पर्धा करू इच्छिता तर आपणास "तथाकथित स्पर्धात्मक क्षेत्रात प्रत्येकाशी निष्पक्षता असली पाहिजे. तुम्ही सर्व मानके पूर्ण करता का? मग स्पर्धा करा. तुम्ही फक्त काहीतरी सुरू केलेल्या व्यक्तीला कामावर ठेवू शकत नाही आणि म्हणू शकत नाही की, 'स्मृती इराणींशी स्पर्धा करा."

सध्या टीआरपीमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर

टीआरपी रिपोर्टनुसार, सध्या रुपाली गांगुलीची मालिका 'अनुपमा' नंबर १ वर आहे. त्यानंतर 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'उडने की आशा' यासारख्या मालिका आहेत.

'अनुपमा' मालिका १३ जुलै, २०२० रोजी ऑनएयर झाला आहे. त्याचे निर्माते राजन शाही आहेत. स्टार प्लस आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही मालिका पाहता येईल. या मालिकेत रुपाली गांगुली शिवाय सुधांशु पांडे, मदालसा शर्मा, गौरव खन्ना यांच्या भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news