समांतर २ : तेजस्विनी पंडित आणि स्वप्निल जोशीचे बोल्ड सीन्स 

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुम्हाला आधीपासूनचं माहिती झालं की, भविष्यात काय होणार आहे; तर मग पुढे होणाऱ्या घटना थांबवण्यासाठी आणि तुमच्या नशीबाला चमकवण्यासाठी, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागता? परंतु, असा कुणी आहे जो नियतीला आव्हान देऊन स्वत: जिंकू शकतो? याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दिग्दर्शक समीर विद्वंस हे मराठी रोमांचक वेब सीरिज 'समांतर'चा दुसरा सीझन घेऊन आले. स्वप्निल जोशी, तेजस्विनी सावंत आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सीरिजमध्ये रोमान्स, थ्रीलर, भय, प्रेम आणि फसवणूक अशा गोष्टी या त्रिकुटांनी आणली आहे. समांतरमध्ये स्वप्निल आणि तेजस्विनी यांच्यावर बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. 

स्वप्नील जोशी , सई ताम्हणकर , तेजस्विनी पंडित या तिघांचा शेवटचा चित्रपट मराठी रोमँटिक ड्रामा तु ही रे होता. आता पुन्हा ६ वर्षांनंतर हे तिघे प्रेक्षकांची मने जिंकायला एकत्र आले आहेत. 

स्वप्निल आणि तेजस्विनी हे दोघे समांतरच्या पहिल्या भागातही झळकले होते. दोघांचाही (कुमार आणि निमा महाजन) रोमँटिक सीन जसा पहिल्या भागात दाखवण्यात आला आहे, तसेच आता दुसऱ्या भागातदेखील दोघांचा रोमान्स पाहायला मिळतोय. स्वप्निल आणि तेजस्विनीचे बोल्ड सीन्स यामध्ये असून एका तरुणीमुळे स्वप्निलचं आयुष्य बदलून जातं. ही तरुणी स्वप्निलच्या आयुष्यात येते. त्या तरुणीची भूमिका मीरा अर्थातचं अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारली आहे. थ्रीलर आणि रहस्यमय असणाऱ्या या सीरिजमध्ये सई ताम्हणकरमुळे स्वप्निलला पश्चाताप होतोय. 

समांतरमध्ये कुमार महाजन म्हणजेच स्वप्निलकडून सुदर्शन चक्रपाणी खूप धूर्तपणे काम करवून घेतो. येणारा भविष्यकाळ कसा असेल, हे तुला आधीचं समजेल असे चक्रपाणी स्वप्निलला सांगतो आणि तशातशा गोष्टी घडत जातात. समांतरच्या दुसऱ्या भागात चक्रपाणी हा स्वप्निलच्या हातात डायरी ठेवतो. तो डायरीमध्ये शोधतो आणि त्याला समजतं की त्याच्य़ा आयुष्यात एक बाई येणार आहे. ती बाई असते-सई ताम्हणकर.

 

कुमार (स्वप्निल) कितीही दूर राहण्याचा प्रयत्न करू दे, पण, सईकडे तो आकर्षित होत असतो आणि या गोष्टीमुळे त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात. आधीच विवाहित असलेल्या पुरुषाच्या प्रेमात सई पडते.  

पण, दुसरीकडे वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे की, माणसांच नशीब त्याच्या कर्मांनी बनतं. आपण, जसे कर्म करणार तसे आपले भाग्य असणार. कोणत्याही मनुष्याला कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य बदलता येत नाही. त्याच्या नशीबात जे आहे, ते होतंचं. सीरिजमधील रहस्य, रोमांच आणि रोमान्सचं जाळं प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करतात. 

'मी सिंधुताई सकपाळ', 'तू ही रे', 'देवा', 'येरे येरे पैसा', गैर यांसारखे चित्रपट गाजवणारी तेजस्विनीने अनेक मालिकांबरोबरचं वेबसीरिजमधून तिने कसदार अभिनय साकारला आहे. तर स्वप्निल, तेजस्विनी आणि सईने तु ही रे याचित्रपटात एकत्र काम केलं आहे. तर सई आणि स्वप्निलने एकत्र 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी'मध्ये एकत्र काम केलं आहे. 'समांतर' च्या पहिल्याचं सीझनमध्ये आपल्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनीने पुन्हा एकदा 'समांतर २' मध्ये बोल्ड सीन दिले आहेत. स्वप्निल-तेजस्विनी पंडितचे 'समांतर २' च्य़ा सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

सुहास शिरवळकर यांच्‍या  समांतर  कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. 'समांतर'चा पहिला भाग सतीश राजवाडे यांनी  दिग्दर्शित केला होता. तर दुसरा भाग समीर विद्वान यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत या भागात अंतरंगी दृश्ये, रोमँटिक सीनचा भडिमार आहे. प्रेक्षकांना शेवटपर्य़ंत खिळवून ठेवणारी 'समांतर-२' ही सीरिज मॅक्स प्लेयरवर पाहता येईंल. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news