

Tara Sutaria Veer Pahariya breakup:
नवी दिल्ली : अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टमधील त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण आता दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत असून यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
'फिल्मफेअर'च्या वृत्तानुसार, तारा आणि वीरने त्यांचे नाते संपवले आहे. मात्र, या ब्रेकअपमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे तारा किंवा वीर या दोघांपैकी कोणीही अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टनंतर काही आठवड्यांतच ही माहिती समोर आली आहे. मुंबईत झालेल्या या कॉन्सर्टमध्ये तारा आणि वीर दोघेही सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान तारा स्टेजवर गेली असता, गायक एपी ढिल्लन तिच्या खूप जवळ आल्याचे दिसले. इतकेच नाही तर त्याने ताराला किस देखील केला होता. या घटनेनंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामध्ये वीरला हे सर्व आवडले नसल्याचे दावे केले जात होते.
त्यावेळी तारा आणि वीरने सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, त्यांच्यात सर्व काही आलबेल आहे. त्यांच्याविरुद्ध नकारात्मक प्रसिद्धी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. वीरने देखील स्पष्ट केले होते की, त्याला या गोष्टींनी फरक पडत नाही आणि त्यांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने इडिट करून शेअर केले जात आहेत.
वीर आणि तारा यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपल्या नात्याची कबुली दिली होती. ताराने तिच्या 'थोडी सी दारू' या गाण्याचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिच्यासोबत एपी ढिल्लन होता. त्यानंतर हे दोघे अनेकदा इव्हेंट्स, डिनर डेट्स आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना एकत्र दिसले होते.