Tripti Dimri | नॅशनल क्रश तृप्ती डिमरीची जागतिक भरारी!

Tripti Dimri  |
Tripti Dimri | नॅशनल क्रश तृप्ती डिमरीची जागतिक भरारी!
Published on
Updated on

2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या 31 वर्षीय तृप्ती डिमरीने आता एक असा टप्पा गाठला आहे, ज्यामुळे तिचे चाहते आणि संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘विक्टोरियाज सीक्रेट’ने तृप्ती डिमरीला आपली पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा ब्रँड केवळ पाश्चात्य सौंदर्याच्या ठराविक चौकटीत अडकलेला होता. ‘विक्टोरियाज सीक्रेट’ने नेहमीच एक विशिष्ट शरीरयष्टी आणि लूकला प्राधान्य दिले होते, ज्याच्याशी सर्वसामान्य महिला स्वतःला जोडू शकत नव्हत्य; मात्र आता हा ब्रँड आपली जुनी प्रतिमा बदलत असून, जगभरातील विविध संस्कृती आणि शरीरयष्टीच्या महिलांना सामावून घेत आहे. या मोठ्या बदलाचा भाग म्हणून तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे. तृप्तीची निवड करणे हा या ब्रँडचा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय मानला जात आहे. या नियुक्तीमुळे आता जागतिक व्यासपीठावर भारतीय सौंदर्याचे प्रतिनिधित्व होणार आहे.

‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्तीचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. अशातं संधीचा फायदा घेत अभिनेत्रीने स्वतःच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. अभिनेत्री स्वतःची फी दुप्पट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती हिने स्वतःचं मानधन 6 कोटींवरून 10 कोटी केलं आहे. सांगायचं झालं तर, तृप्तीच्या मानधना पुढे आता अभिनेत्री जान्हवी कपूर हिचं मानधन देखील कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news