Girija Oak Blue Saree |'त्या' निळ्या साडीचं काय केलंस? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक यावर स्पष्टच बोलली...

Girija Oak Blue Saree |'त्या' निळ्या साडीचं काय केलंस? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक यावर स्पष्टच बोलली...
Girija Oak Blue Saree
Girija Oak Blue Saree Pudhari photo
Published on
Updated on

अभिनेत्री गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील एका मुलाखतीच्या क्लिपने गेल्या वर्षी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिच्या साध्या, मोहक अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि पाहता पाहता गिरीजाला ‘नॅशनल क्रश’ अशी उपमा मिळाली. विशेष म्हणजे या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली साडी कोणती महागडी किंवा भव्य डिझायनर साडी नव्हती. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या लूकने गिरीजाची वेगळीच छाप पाडली.

आता इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा त्या व्हायरल निळ्या साडीची चर्चा रंगली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजाला, ‘त्या निळ्या साडीचं आता काय केलंस?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने थेट उत्तर न देता मिश्कील अंदाजात हा किस्सा सांगितला. गिरीजा म्हणाली की, ती साडी सध्या नेमकी कुठे आहे हे ती सांगणारच नाही. कारण तिने साडी कुठे ठेवली आहे हे कळलं, तर अनेकजण तिच्याकडे त्याच साडीची मागणी घेऊन येतील!

‘सगळ्यांना वाटतंय, गिरीजा फक्त निळी साडीच नेसते’

गिरीजाने या प्रश्नावर हसत सांगितले की, अनेक ब्रँड्सकडून तिला त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी त्या निळ्या साडीतच दिसण्याची अपेक्षा केली जाते. तिच्या मॅनेजरलाही अशा विनंत्या सतत ऐकाव्या लागतात. त्यामुळे आता ‘गिरीजाला शूटसाठी बोलवायचं म्हणजे निळी साडी हवीच’, अशी काहींची समजूत झाल्याचे ती गंमतीने सांगते.

एका पॉडकास्टमधील क्लिपने बदलली परिस्थिती

गिरीजाचा हा लूक एका पॉडकास्टमधील मुलाखतीदरम्यानचा होता. त्या मुलाखतीतील तिच्या बोलण्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिचे निळ्या साडीतील फोटोही मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागले. काही नेटकऱ्यांनी तिची तुलना परदेशी अभिनेत्रींसोबत केली, तर अनेकांनी तिला ‘ब्लू साडी गर्ल’ आणि ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणण्यास सुरुवात केली.

गिरीजा या प्रसिद्धीबद्दल म्हणते, सोशल मीडियावरील ट्रेंडची लाट येते आणि काही काळाने ओसरते. त्यामुळे या लोकप्रियतेपेक्षा तिचे काम कायम राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे तिने यापूर्वीही स्पष्ट केले आहे.

‘नॅशनल क्रश’च्या टॅगवरही गिरीजाची स्पष्ट भूमिका

विशेष म्हणजे ‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळाल्यानंतरही गिरीजाने त्याला स्वतःचे यश मानले नाही. एका प्रमोशनल मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्या लूकसाठी तिने काहीही कमावलेले नाही; ही तिच्या जनुकांची देणगी आहे. तिची सहकलाकार कंगना राणौतने मात्र विनोदाने गिरीजाने आपल्या सौंदर्याचा उपयोग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करावा, असे म्हटले होते. म्हणूनच, गिरीजाची ‘निळी साडी’ आजही तिच्या व्हायरल क्षणाची ओळख बनली असली, तरी त्या एका लूकच्या पलीकडे तिचा दीर्घ अभिनयप्रवास आणि तिची स्वतंत्र ओळखही तितकीच महत्त्वाची आहे.

Girija Oak Blue Saree
Sunday 1996 | कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार घेऊन येतोय ‘संडे १९९६’

गिरीजाचा हा लूक एका पॉडकास्टमधील मुलाखतीदरम्यानचा होता. त्या मुलाखतीतील तिच्या बोलण्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिचे निळ्या साडीतील फोटोही मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागले. काही नेटकऱ्यांनी तिची तुलना परदेशी अभिनेत्रींसोबत केली, तर अनेकांनी तिला ‘ब्लू साडी गर्ल’ आणि ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणण्यास सुरुवात केली.

गिरीजाने मात्र या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. तिच्या मते, सोशल मीडियावरील ट्रेंडची लाट येते आणि काही काळाने ओसरते. त्यामुळे या लोकप्रियतेपेक्षा तिचे काम कायम राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे तिने यापूर्वीही स्पष्ट केले आहे.

Girija Oak Blue Saree
Haiwaan Teaser |हीरो कोण आणि हैवान कोण? अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चा रहस्यमय टीझर चर्चेत, १८ वर्षांनंतर पुन्हा आमनेसामने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news