

Tanushree Dutta shared crying video on social media
मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताचा रडताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. मला माझ्या घरातचं..म्हणत तिने व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये कशा प्रकारे तिचा छळ केला जात आहे, तिला त्रास दिला जात आहे, आणि ती आपल्या घरात नोकर देखील ठेऊ शकत नाही. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया.
तनुश्री दत्ता जिने मीटू अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर "हॉर्न ओके प्लीज"च्या सेटवर दुर्व्यवहाराचा आरोप लावला होता. ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा धक्कादायक आरोपांसोबत ती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. आणि व्हिडिओमध्ये दावा करत आहे की, तिला आपल्याच घरात त्रास दिला जात आहे. तिने व्हिडिओ सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मी या छळाने खूप कंटाळले आहे. हे २०१८ पासून सुरु आहे. #metoo आज कंटाळून मी पोलिसांना बोलावलं आहे. कृपया कुणीतरी माझी मदत करा."
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तनुश्री अस्वस्थ दिसतेय. ती रडताना दिसतेय. 'माझ्या स्वतःच्या घरात माझा छळ केला जात आहे, असे म्हणताना ती दिसतेय.
तनुश्रीने पुढे सांगितले की, 'मी नुकताच पोलिसांना फोन केला. त्यांनी मला योग्य तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. मी कदाचित उद्या किंवा परवा जाईन. माझी तब्येत ठीक नाही. मला इतका त्रास दिला आहे मागील ४ ते ५ वर्षांपासून.'
तिने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांच्या मानसिक त्रासामुळे तिचे आरोग्य ढासळले आहे. 'माझी तब्येत खराब झाली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये....'
ती म्हणते की, हा छळ भावनिक त्रासापेक्षाही जास्त आहे. मी नोकर देखील ठेवू शकत नाही. नोकरांबाबत मला खूप वाईट अनुभव आला आहे. ते येऊन माझ्या घरातून साहित्य चोरत होत्या. मला माझे काम स्वत: करावे लागते. मला माझ्या घरात त्रास दिला जातोय...