

Shraddha Kapoor reaction on Saiyaara movie
मुंबई - सध्या सैयाराचीच सगळीकडे चर्चा आहे. थिएटर्समध्ये तरुण-तरुणींची गर्दी पाहायला मिळतेय. खूप साऱ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत असताना आता अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी सैयाराची तुलाना श्रद्धा कपूरच्या आशिकी-२शी केली जात होती.
मोहित सूरी दिग्दर्शित आणि अहान पांडे-अनीत पड्डा स्टारर लव्ह स्टोरी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काल रात्री आशिकी २ ची अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'सैयारा' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, 'प्योर सिनेमा, प्योर ड्रामा, प्योर मॅजिक. उफ्फ...बहुत टाइम बाद इतना इमोशन फील किया है.' तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटे शेअर करून लिहिलं- 'या मोमेंटसाठी पाच वेळा चित्रपट पाहिन.'
सिनेप्रेमींना 'सैयारा'चे वेड आहे, ही प्रेमकहाणी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे.
यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांची ‘सैयारा’ या चित्रपटाने डेब्यू चित्रपट म्हणून ऐतिहासिक वीकेंड कमाई नोंदवली आहे. भारतामध्ये ८४ कोटी रुपये नेट कमाई केली आहे. नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांना रातोरात स्टार्स आणि देशाचे लाडके चेहरे बनले आहेत.
शुक्रवार – २२.०० कोटी
शनिवार – २६.२५ कोटी
रविवार – ३५.७५ कोटी
एकूण नेट कमाई (भारत): ८४.०० कोटी
एकूण ग्रॉस (भारत): १०१.७५ कोटी
जगभरातील एकूण ग्रॉस कमाई (GBOC): ₹११९.०० कोटी
भारत: १०१.७५ कोटी (ग्रॉस)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ: १७.२५ कोटी
फक्त ३ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये सामील होत, 'सैयारा'ने एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे, आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या प्रेमकथेची जादू अनुभवत आहेत. अनेक कपल्स आणि प्रेक्षकांचे थिएटर्समधून रडताना, भावूक झालेले, ओरडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.