पुढारी ऑनलाईन :
अभिनेत्री तारा सुतारीयाचा तडप रोमँटिक थ्रीलर चित्रपट तडपचा प्रीमीयर (Tadap Premier) सोहळा पार पडला. तडपमध्ये तारा सुतारीया अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रीमीयरवेळी तारासोबत बॉलिवूडचा दबंग सलमान खानने हजेरी लावली. यावेळी सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माही उपस्थित होता. (Tadap Premier)
या सोहळ्यावेळी ताराने स्लिट ब्लॅक कलर गाऊन परिधान केला होता. ब्लॅक इज अलवेज इन फॅशन म्हणत चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. यावेळी सलमान खान आणि तारा यांनी कॅमेरा पर्सनना खूप सुंदर पोज दिली. सलमान ताराच्या कंबरेवर हात ठेवत पोज दिल्यानंतर तो क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला.
त्याचबरोबर, तारादेखील व्यासपीठावर आल्याबरोबर सलमानच्या खांद्यावर हात ठेवत पोज देऊ लागली. दोघांनीही पोज दिल्यानंतर हे क्षण कॅमेराबध्द करण्यासाठी लोक पुढे सरसावले. यावरून अंदाज बांधला जात आहे की, कदाचित सलमान खान आपल्या आगामी चित्रपटात ताराला ब्रेक देईल. अनेक अभिनेत्रींचा गॉडफादर असणारा अभिनेता सलमानला त्याच्या नव्या चित्रपटासाठी कदाचित नवी हिरोईन मिळाल्याचा कयास लावला जात आहे.
याआधी 'तडप'चे पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' आज धनत्रयोदशीला रिलीज झाले हहोते. अहानने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली होती. त्याने गाण्याची एक छोटी क्लिप पोस्ट केली होती. क्लिपमध्ये तो आणि तारा चुंबन घेताना आणि रोमांचक क्षण एकत्र घालवताना दिसत होते. मात्र, पुढच्याच क्षणी कोणीतरी त्यांना ओढून एकमेकांपासून दूर करतात. त्याची बाईक देखील पेटवली जाते. तेव्हापासूनचं या गाण्याने चाहत्यांना चित्रपटांविषयी उत्सुकता लागून राहिली होती. या गाण्याला रसिकांची खूप पसंती मिळाली होती.
साजिद नाडियाडवाला निर्मित, फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मिती आहे. रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट प्रॉडक्शन 'तडप' ३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. अहान शेट्टी आणि तारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अहानने तडप चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.