

Sussanne Khan Mother Zarine Khan Death
मुंबई : अभिनेते संजय खान यांच्या पत्नी आणि सुजैन खान यांच्या आई जरीन खान यांचे निधन झाले आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. जरीन खान या लोकप्रिय सोशलाइट आणि इंटेरियर डिझायनर म्हणून ओळखल्या जायच्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती, आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जरीन खान यांच्या निधनानंतर संजय खान कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुंबईत अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सुजैनचा एक्स पती आणि अभिनेता ऋतिक रोशनदेखील अंत्यसंस्काराला उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची जोडीदार सबा आझादही दिसली. जया बच्चन, शबाना आजमी, बॉबी देओल , काजोल, तिची आई या देखील उपस्थित राहिल्या.
जरीन खान यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा जायद खान, अभिनेता यावेळी होता. प्रेयर मीट सोमवारी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
video - viralbhayani insta वरून साभार
जरीन यांच्या परिवारात त्यांचे पती संजय खान, मुले सुजैन खान, सिमोन अरोडा, फराह अली खान आणि जायद खान आहेत.
संजय खान आणि जरीन यांची भेट एका बस स्टॉपवर झाली होती. तिथे ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी १९६६ मध्ये लग्न केले होते. लग्नाआधी जरीन यांनी हिंदी चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. ते चित्रपट होते -'तेरे घर के सामने' आणि 'एक फूल दो माली'.