बाळूमामाच्या नावानं चांगभलं : सुरेखा कुडची अक्काच्या भूमिकेत

सुरेखा कुडची
सुरेखा कुडची

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री पाहायला मिळणार आहे. अक्का ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मालिकेत बाळूमामांच्या मेंढ्या आजारी आहेत. औषधोपचार करून ही काही मेंढ्या मारतात, आजार वाढत चालला आहे. त्यात तात्या आणि त्यांची बायको मामांना अक्काकडून उतारा करून घेण्यास सांगतात पण सेवकांना प्रश्न पडतो, ही अक्का आहे तरी कोण? अक्का मामांपेक्षा मोठी आहे का?

संबंधित बातम्या – 

अक्का ही एक देवीची भक्त आहे. अंगावर सोनं मढवलेलं, उंची साड्या,.घरात देवीचं ठानं मांडलेलं.गावातली लोकं तिला घाबरून असतात, गावकऱ्यांना कोणता ही त्रास असला कि अक्काकडे उतारा करायचा नाही तर संकट नाही टळणार, गावात असं वातावरण असताना बाळूमामांच्या मेंढयांवर संकट आलं असून आता मामा स्वतः अक्का कडे जातील का? अक्का आणि मामा यांचा होणार का सामना? हे बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका पाहिल्यानंतर समजणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news