New TV Serial : श्रीमद् रामायण मालिकेचा प्रोमो रिलीज, यादिवशी भेटीला | पुढारी

New TV Serial : श्रीमद् रामायण मालिकेचा प्रोमो रिलीज, यादिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ‘श्रीमद् रामायण’ मालिका १ जानेवारी, २०२४ पासून सुरू होत आहे. ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेतून हे दिव्य भारतीय महाकाव्य नव्या पद्धतीने समोर येणार आहे. वाहिनीने आता पुढील प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये जन-जन के आदर्श, मन-मन के आराध्य सिया राम यांचे दर्शन घडत आहे.

संबंधित बातम्या –

मालिकेत सीतेची भूमिका प्राची बन्सल साकारत आहे. तिच्या रूपात सीता मातेचा शालीन डौल, लवचिकता आणि सीता मातेचे सामर्थ्य आपल्याला पडद्यावर दिसेल. अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांची भूमिका करत आहे. जारी करण्यात आलेल्या नवीन प्रोमोमध्ये सीता मातेचा दृढ विश्वास आणि तिच्या मनातील श्री रामाविषयीचे अपार कौतुक दिसते. तिला तो केवळ एक राजकुमार वाटत नाही, तर एक आदर्श जीवनसाथी म्हणून ती त्याच्याकडे पाहते.

संबंधित बातम्या

सीतेच्या भूमिकेविषयी प्राची बन्सल म्हणते, “मला तर वाटते आहे की, ही भूमिका मी माझ्यासाठीच साकारली आहे. अशी भूमिका फार कमी कलाकारांना त्यांच्या जीवनात करायला मिळते. आपण रामायणाच्या विविध गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झालो आहोत. त्यामुळे ही सर्वांच्या परिचयाची गोष्ट रोचक पद्धतीने साकारणे हे एक आव्हान आहे. राम आणि सीता ज्या गुणांसाठी ओळखले आणि पूजले जातात, ते गुण म्हणजे, चिरंतन प्रेम, अढळ निष्ठा आणि दृढ विश्वास. हे गुण आम्हाला सौंदर्यदृष्टीने प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत.”

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणाला, “या प्रोमोमध्ये सीता आणि रामाच्या नात्यातील प्रगाढ प्रेम आणि एकमेकांविषयीचा आदर व्यक्त होतो, ज्यामुळे या कालातीत कहाणीला एक नवी भावनिक खोली प्राप्त होते.”

Back to top button