Mouni Roy Suraj divorce: कोणतीही पोटगी नाही, कोणी तिसरा नाही, वाद नाही तरी... यात 'त्या' मित्रांना ओढणे चुकीचे, सुरजची पोस्ट

Mouni Roy Suraj divorce
Mouni Roy Suraj divorcepudhari
Published on
Updated on

Mouni Roy Suraj Nambiar divorce Post: मौनी रॉय आणि सूरज नांबियार या दोन स्टार जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा देखील दिला. मात्र काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की मौनीने सूरजकडून पोटगी मागितलेली आहे. तर काहींनी तर्क लावला की या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले आहे. आता याबाबत सूरज नांबियारने पोस्ट करत खुलासा केला आहे.

Mouni Roy Suraj divorce
mouni roy suraj nambiar divorce : मौनी रॉय हिच्या घटस्फोटाच्या चर्चा ठरल्या खऱ्या!

पोस्ट व्हायरल

सूरज आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहितो की, 'मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, कोणतीही पोटगी मागण्यात आलेली नाही. आमच्या दोघांमध्ये कोणता वाद नाही. आमच्या दोघांमध्ये कोणताही तिसरा व्यक्ती आलेला नाही. मौनी आणि मी एकमेकांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. हेच सत्य आहे. याच्याव्यतिरिक्त जे काही बोललं जात आहे ते आम्हाला बदनाम करण्यासाठी बोललं जात आहे.'

Mouni Roy Suraj divorce
Mouni Roy-Suraj Nambiar divorce : मौनी रॉयने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बंद केले इन्स्टाग्रामवरील कमेंट्स; दिशा पाटनीवर चाहत्‍यांचा संताप का?

निर्दोष मित्रांना का ओढता?

सूरज आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो की, 'मी पुन्हा एकदा सांगतोय की आमच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आल्याच्या दाव्यात जरा सुद्धा सत्यता नाही. या प्रकरणात दुसऱ्या व्यक्तींना विशेषकरून त्या निर्दोष मित्रांना ओढणे चुकीचे आहे. त्यांचे याच्याशी काही घेणे-देणे नाही. मौनी आणि मी या संपूर्ण प्रकरणात आमची गरिमा शाबूत ठेवली आहे. मीडियाकडून देखील आम्ही त्याचीच अपेक्षा करतो. रिपोर्टिंग करताना गरिमा पाळली पाहिजे.'

Mouni Roy Suraj divorce
Disha Patani Mouni Suraj relationship: संसारात पडला मिठाचा खडा..? मौनीच काय दिशानेही केलं सुरजला 'अनफॉलो', चर्चांना उधाण

मुद्दाम चुकीची माहिती पसरवली जातेय

'माध्यमांनी ज्या गोष्टी रंगवल्या आहेत त्या अस्तित्वातच नाहीयेत. हे वृत्त कोणत्याही पुष्टीशिवाय पब्लिश केलं गेलं आहे. मी इतक्या खुलेपणाने यावर बोलत आहे. कारण यात काही तथ्य नाहीये. चुकीची माहिती मुद्दाम पसरवली जात आहे. हे मला मान्य नाही. जे गरजेचं होतं ते आम्ही आमच्या वक्तव्यात सांगितलं होतं. मी सर्वांना विनंती करतो की अफवा पसरवू नका आम्हाला शांततेत राहू द्या.'

Mouni Roy Suraj divorce
Ranveer Allahabadia girlfriend: यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड, जुही भट्ट कोण आहे? RCB vs MI सामन्यात दिसली जोडी!

सूरज आणि मौनीचे लग्न २०२२ मध्ये झाले होते. त्यांची पहिली भेट ही २०१८ मध्ये दुबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवेळी झाली होती. त्यावेळी सूरज बाऱ्याच काळापासून परदेशात राहतो आहे. त्याला मौनीच्या लोकप्रियतेबाबत कल्पना नव्हती. एका भेटीपासून सुरू झालेला हा सिलसिला हळूहळू प्रेमाच्या नात्यात बदलला. अखेर त्यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या ४ वर्षानंतर दोघेही सहमतीने वेगळे होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news