

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Day 1 Box Office Collection
मुंबई - सनी संस्कारी की तुलसी कुमारी चित्रपटगृहात रिलीज झाले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने रिलीज झालेल्या या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर शानदार ओपनिंग केले. शशांक खैतान दिग्दर्शित सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट कांतारा चॅप्टर १ ला टक्कर देईल, असे म्हटले जात होते. पहिल्या दिवशी सनी संस्कारीने किती कमाई केली, जाणून घेऊया.
सनी संस्कारी की तुलसी कुमारीने पहिल्याच दिवशी शानदार कमाई केली. वरुण धवन-जान्हवी कपूर स्टारर चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. वर्ल्डवाईड आकडा १५ ते २० कोटी रुपयांचा आहे. चित्रपटाचे बजेट ८० कोटी आहे. पण, पहिल्या दिवशी सनी संस्कारी डबल डिजिट देखील कमाई करू शकला नाही. कांतारा चॅप्टर १ ने सनी संस्कारी पेक्षा पाच पट अधिक कमाई केली आहे. कांतारा चॅप्टर १ ने सर्व भाषेत मिळून पहिल्या दिवशी ६० कोटी कमावले होते. आता सनी संस्कारीला विकेंडचा किती फायदा होतो, हे पाहावे लागेल.
वरुण धवन आणि जान्हवी कपूरची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. ॲमेजॉन प्राईम चित्रपट 'बवाल'मध्ये त्यांना पाहण्यात आलं होतं. या चित्रपटांना मिक्स रिव्ह्यू मिळाले होते. सनी संस्कारीचे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चित्रपटातील 'बिजुरिया 'गाणे प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरत आहेत.
सनी संस्कारी की तुलसी कुमारीची कहाणी सनी आणि तुलसीची आहे, जे आपापले पार्टनरना मिळवण्यासाठी एकत्र येतात आणि मग त्यांना प्रेम होतं. चित्रपटात वरुण -जान्हवी, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत केलं आहे. चित्रपटाची कहाणी हलकी-फुलकी रोमँटिक आणि कॉमेडीने भरलेली असून ती प्रेक्षकांना किती भावते, हे पाहावे लागेल.