

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari green signal cbfc
मुंबई - सनी संस्कारी की तुलसी कुमारीची रिलीज तारीख आता केवळ २ दिवस उरले आहेत. मात्र त्याआधीच सेन्सॉर बोर्डाने (CBFC) चित्रपटात काही महत्त्वाचे बदल करण्यास सांगितले आहेत. सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा असून त्यामध्ये कौटुंबिक मूल्ये आणि हलकाफुलका मनोरंजन यांचा उत्तम संगम आहे. सीबीएफसीने काय काय बदल केलेत, पाहुया.
सीबीएफसीने या चित्रपटाला दोन कट्ससोबत पास केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटातील एका किसिंग सीनवर सेन्सॉर बोर्डाने लक्ष केंद्रीत केले आहे. हा सीन जसाच्या तसा ठेवायचा की त्यात काही सुधारणा करायच्या, याबाबत बराच विचार झाला. अखेरीस बोर्डाने सीन कमी करण्याचा आणि त्याचा कालावधी थोडा कट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रसंग पडद्यावर दाखवला जाईल, मात्र पूर्वीइतका लांबवला जाणार नाही. सीबीएफसी तपास समितीने लिप-लॉक दृश्यांना ६० टक्के पर्यंत कमी केलं आहे. शेवटी, निर्मात्यांना अँटी-अल्कोहोल स्टॅटिक जोडण्यास सांगितले.
फक्त इतकेच नाही, तर चित्रपटातील काही डायलॉग्सवर देखील बदल करण्यात आले आहेत. एका संवादात वापरलेला शब्द पूर्णपणे म्यूट करण्यात आला आहे. जिथे जिथे 'गार्ड' शब्द येतो, तो म्यूट करण्यात आला आहे.
या बदलांसह सनी संस्कारी की तुलसी कुमारीला U/A 13+ सर्टिफिकेट मिळाले आहे. सेन्सॉर सर्टिफिकेटवर चित्रपटाची लांबी १३५.३५ मिनिटे आहे. म्हणजेच सनी संस्कारी की तुलसी कुमारी २ तास, १५ मिनिटे आणि ४५ सेकंदाचा असेल.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी २ ऑक्टोबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे. यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि अभिनव शर्मा आहे. दिग्दर्शक शशांक खेतान तर निर्मिती करण जोहर सोबत धर्मा प्रोडक्शन्स आणि शशांकच्या मेंटर डिसायपल एंटरटेनमेंटने केलं आहे.
"सनी संस्कारी की तुलसी कुमारी"चे ट्रेलर लॉन्च १५ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला. सान्या मल्होत्रा यावेळी अनुपस्थित होती.