

Prabhas movie The Raja Saab Trailer released
मुंबई - साऊथ स्टार प्रभासच्या फॅन्ससाठी नवा चित्रपट 'द राजा साब'चा ट्रेलर आनंदाची पर्वणी घेऊन आलाय. एकापेक्षा एक स्टारकास्ट असलेल्या हा चित्रपट बहुप्रतीक्षित असून आता दमदार ट्रेलर रिलीज झालाय. 'सालार' आणि 'कल्कि 2898 AD' नंतर प्रभासच्या फॅन्स द राजा साबची प्रतीक्षा आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केलाय, जो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
चित्रपट द राजा साबचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. तब्बल ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ट्रेलरमधूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिग्दर्शकाच्या टीमनं या प्रोजेक्टसाठी जगातील सर्वात मोठे सेट उभारल्याचे म्हटले जात आहे. ट्रेलरमध्ये प्रभासचा अॅक्शनने भरलेला दमदार अंदाज, भव्य सेट्स आणि एकापेक्षा एक स्टार्सची एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
संक्रांत २०२४ ला या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि एप्रिल २०२५ रोजी रिलीज करण्यात येणार होता. पण नंतर निर्मात्यांनी प्रोडक्शनमध्ये उशीर झाल्याचे कारण सांगत नव्या रिलीज डेटची घोषणा केली होती. चित्रपटाच्या कथानकाची थोडी झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलीय. त्यात ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने भरपूर आहे. प्रभासच्या ॲक्शन्ससोबत व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलाय.
रिपोर्टनुसार, निर्माते टी.जी. विश्व प्रसाद यांनी सांगितले की, पीपल्स मीडिया फॅक्ट्रीच्या स्टुडियोमध्ये हवेलीचा जो सेट उभारण्यात आला आहे, तो ३५ हजार स्क्वेयर फूटमध्ये पसरला आहे. त्यांनी हा देखील दावा केला की, जगातील एखाद्या चित्रपटाचा हा सर्वात मोठा सेट असेल. १२०० जणांनी मिळून चार महिन्यात हा सेट उभारल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर #TheRajaSaabTrailer हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांनी कमेंट करत लिहिलं आहे, “प्रभासचा हा ट्रेलर बघून थरारला”, “बजेट आणि भव्यता पाहून हॉलिवूडची आठवण झाली”. चाहत्यांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. ट्रेड ॲनालिस्टच्या मते, द राजा साब हा सध्याच्या काळातील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. ४०० कोटींच्या भव्य बजेटमुळे आणि प्रभाससारख्या सुपरस्टारच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट काय जादू दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.