सनी लिओनच्या नव्या गाण्यावरून वाद

सनी लिओन
सनी लिओन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

1960 मध्ये आलेल्या दिलीपकुमार यांच्या 'कोहिनूर'या चित्रपटात मोहम्मद रफींनी गायिलेले एक गाणे 'मधुबन मे राधिका नाचे' गाजले होते. शकील बदायुँनी यांची ही रचना संगीतबद्ध केली होती नौशाद यांनी. हे आता आठवायचे कारण म्हणजे, हेच शब्द असलेले एक मॉडर्न गीत नुकतेच रीलिज झाले आहे. या नव्या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये आहे अभिनेत्री सनी लिओन.

गायिका कनिका कपूरने हे गाणे गायिले आहे आणि आता या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका होत आहे. सनीने हे गाणे ट्विटरवर शेअर करून चाहत्यांना 'पाहिले का?' असा प्रश्‍न विचारला होता. त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली, तसेच या गाण्यावर बंदीचीही मागणी केली जात आहे. राधा ही नर्तकी नव्हती आणि मधुबन हे एक शांत ठिकाण आहे. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. कृष्ण-राधेची पूजा करायला शिका, असे काहींनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news