Sunny Deol: करण देओल सोबत अटारी बॉर्डर पोहोचला सनी देओल, बीएसएफ जवानांसोबत प्रत्यक्ष भेट

Sunny Deol: करण देओल सोबत अटारी बॉर्डर पोहोचला सनी देओल, बीएसएफ जवानांसोबत प्रत्यक्ष भेट
image of sunny deol and family
Sunny Deol post on attari border visited army Instagram
Published on
Updated on

Sunny Deol attari border Post viral

मुंबई - सनी देओल सध्या आपल्या आगामी चित्रपटांमुळे खूप बिझी आहे. दरम्याने तो आपला मुलगा करण देओल सोबत अटारी बॉर्डरवर पोहोचली. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो परिवारासोबत बॉर्डरवर पोहोचलेला दिसतो. त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट देखील लिहिलीय. करण देओल आणि त्याची सून देखील सोबत दिसत आहे.

सनी देओल, मुलगा करण आणि सून द्रिशा सोबत तो अटारी बॉर्डर येथे पोहोचतो. पहिल्यांदा करण - द्रिशा आचार्य या सोहळ्याला उपस्थित असल्याचे सनी देओलने सांगितले. सनीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्वजण बीएसएफ जवानांशी प्रत्यक्ष भेटत असताना दिसताहेत. व्हिडिओत सुरुवातीला सनी बॉर्डरवर गाडी चालवताना दिसतोय. त्यानंतर ते करण आणि द्रिशासोबत बीएसएफ जवानांना भेटतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करतात आणि संवाद साधतात. सर्वजण हसत-खेळत देशभक्तीचा माहोल अनुभवत आहेत.

image of sunny deol and family
The Taj Story Trailer | मंदिर की मकबरा? द ताज स्टोरीच्या ट्रेलरमधून वादाला फुटले तोंड, उघडणार २२ बंद खोल्यांचे रहस्य

सनीने पोस्टसोबत लिहिलं आहे – 'हिंदुस्तान जिंदाबाद! अटारी बॉर्डरवर बीएसएफ जवान मित्रांसोबत काही क्षण घालवले. करण आणि द्रिशा पहिल्यांदाच हा अनुभव घेत आहेत.' या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. सनी देओल आपल्या सून आणि मुलासोबत आनंद घेताना दिसताहेत. नंतर सनी आणि करण सोबत जवानांनी सेल्फी देखील घेतली.

सनी देओलने व्हिडिओ सोबत बॅकग्राऊंडमध्ये “फायटर” मधील “वंदे मातरम (द फायटर एंथम)” ट्रॅक लावला आहे.

दरम्यान, बुधवारी सनीने सोशल मीडियावर दिग्गज अभिनेते पंकज धीर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं होतं. त्याने दिवंगत अभिनेत्याचा तरुणपणातील एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला होता. त्याने भावूक श्रद्धांजली देखील वाहिली.

image of sunny deol and family
Thamma Advanced Booking | तिकीट बारीवरचे २४ तास, 'थामा'चे तुफान ॲडव्हान्स बुकिंग; आयुष्मान खुराना-रश्मिकाची जबरदस्त क्रेझ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news