Kesari Veer Trailer | 'ये शिव कौन है' म्हणत केसरी वीरचा ट्रेलर रिलीज; सुनील शेट्टी-सूरज पंचोली दमदार वीर भूमिकेत

Kesari Veer Trailer Out | धर्म रक्षणासाठी महानायकांची कहाणी; सुनील शेट्टी-सूरज पंचोली दमदार वीर भूमिकेत
image of Suniel Shetty Kesari Veer Film
सुनील शेट्टीच्या दमदार भूमिकेतील केसरी वीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहेInstagram
Published on
Updated on

Suniel Shetty Sooraj Pancholi Kesari Veer Trailer Out Now

मुंबई : 'केसरी वीर' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले असून ट्रेलर सोबत एक पंच लाईन शेअर करण्यात आली आहेत. त्यामध्ये लिहिलंय -' धर्म की रक्षा, आस्था का संकल्प और सोमनाथ की पवित्र भूमि का गौरव'. चित्रपटाची कहाणी महानायकाच्या वीरतेवर आधारित आहे, ज्यांनी सोमनाथ मंदिरावर वाईट नजर टाकणाऱ्यांचा खात्मा केला. देशासोबतच आस्थेची रक्षा करणाऱ्या महानायकांची ही कथा आहे.

केसरी वीर ट्रेलरची दमदार सुरुवात

केसरी वीरचा ट्रेलर जवळपास ३ मिनिट ७ सेकंदाचा आहे. 'ये शिव कौन है' अशा डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते, 'भाई जान ये काला पत्थर है जिसमें भस्म लगाते हैं'... त्यानंतर सोमनाथ मंदिरावर आक्रमण होताना दिसते.

image of Suniel Shetty Kesari Veer Film
Suniel Shetty Kesari Veer | पहलगाम हल्ल्यानंतर निर्मात्याचा मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये होणार नाही 'केसरी वीर' रिलीज

'राजपूतांच्या रक्तात पराभव लिहिलेलाच नाही'

एका दमदार डायलॉग सोबत सूरज पंचोलीची एन्ट्री होते. 'केसरी वीर' ट्रेलरमध्ये 'हमारे राम की भूमि है, हमारे कृष्ण की भूमि है, हमारे शिव की भूमि है। हम राजपूतों के खून में हार लिखी ही नहीं'...'उस राख में से एक चिंगारी निकलेगी। एक योद्धा की पहचान उसके तलवार पर लगे लहू से होती है, उसके नाम से नहीं...असे डायलॉग ऐकू येतात.

image of Suniel Shetty Kesari Veer Film
Comedian Abhishek Upmanyu | पाकिस्तानी युजरला समर्थन देणं पडलं भारी, स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युने एक्स अकाऊंट केलं डिॲक्टिवेट

सूरज पंचोली - आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत

प्रिंस धीमान दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय शिवाय सूरज पंचोली आणि आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. कानू चौहान हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

हमीरजी गोहिल यांच्या वीरतेची कहाणी 'केसरी वीर'

हमीरजी गोहिल यांच्या वीरतेची कहाणी असून ते देशाचे महान नायक होते, जे सोमनाथ मंदिर आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तुघलक साम्राज्याविरोधात लढले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news