Mamta Kulkarni: दाऊद इब्राहीमने मुंबईमध्ये ब्लास्ट केलाच नव्हता, तो आतंकवादी नाहीये; ममता कुलकर्णी बरळली

तिने बोलत बोलत दाऊद इब्राहीमला क्लीन चिट दिली
Entertainment
अभिनेत्री ममता कुलकर्णी Pudhari
Published on
Updated on

90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पण तिच्या विधानाने देशभरात खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात असताना तिने दाऊद ईबराहीमबाबत असे काही स्टेटमेंट केले की प्रत्येकाच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. तिने बोलत बोलत दाऊद इब्राहीमला क्लीन चिट दिली. हे विधान सोशल मिडियावर व्हायरल होताच नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Latest Entertainment News)

काय म्हणाली ममता कुलकर्णी?

ममता म्हणते, ‘ दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता. त्याने बॉम्ब ब्लास्ट केले नाहीत. तो आतंकवादी नाही. मुंबईत बॉम्बस्फोट कधी केले नाहीत.’ या विधानाच्या शेवटी तिने हे देखील सांगितले की ती दाऊदला प्रत्यक्षात कधीच भेटली नाही. पुढे ती म्हणते की, आता ती पूर्णपणे अध्यात्माच्या रस्त्यावर आहे. राजकारण आणि सिनेमाशी तिचा काहीच संबंध नाही.

Entertainment
Kyunki Saas Bhi Kabhi: क्यों की सास भी कभी.. लवकरच घेणार निरोप? हे आहे त्यामागचे कारण

1993 च्या बॉम्बस्फोट आणि दाऊद ईबराहीम विषयी

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून दाऊद ईबराहीमचे नाव समोर आले आहे. याशिवाय तो अजूनही भारताच्या मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांच्या यादीत आहे. ममताचे हे विधान ऐकून सोशल मिडियावर मात्र नाराजी आणि राग व्यक्त केला आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. सीबीआय आणि एनआयएच्या रिपोर्टनुसार दाऊद मास्टरमाइंड होता . सध्या तो फरार आहे. ममताच्या विधानाने भारतीय न्यायपालिका, सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणा यांच्या तपासाला आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

Entertainment
The Family Man Season 3: ठरलं तर ! फॅमिली मॅन या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; हटके प्रोमो आहे चर्चेत

कोण आहे ममता कुलकर्णी?

90 च्या दशकात ‘करण अर्जुन’, ‘कृष्णा’, ‘बाजी’ आणि ‘क्रांतिवीर’ अशा सुपरहिट सिनेमात दिसलेली ममता त्यानंतर गायब झाली. त्यानंतर ती थेट 2016 मध्ये केनया येथील ड्रग तस्करी संदर्भात तिचे नाव समोर आले होते. त्यावेळी प्रत्यार्पणानंतर तिला अटकही केली गेली होती. 2025 च्या कुंभ मेळयाच्या आधी तिने 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर कुंभमेळयात संन्यास घेऊन ‘माई ममता नंद गिरी’ या नावाने ओळखली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news