

मुंबई - मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली तेजश्री प्रधान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे. एक नाही तर दोन मोठ्या सरप्राइजेस ती लवकरच घेऊन येतेय. एकीकडे तिचा नवीन सिनेमा "मुजरा" लवकरच रिलीज होणार आहे, तर दुसरीकडे ती आणि सुबोध भावे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असल्याचं संकेत मिळाल्यानं चाहत्यांमध्ये उत्सुकता तुफान वाढली आहे!
सुबोध भावेने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने लिहिलंय "होणार सून ही ह्या घरची!". या पोस्टमध्ये त्याने तेजश्री प्रधान हिला टॅग केल्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. "लवकरच..." अशीही कॅप्शन त्याने लिहिली असून, चाहत्यांना वाटतंय की हे दोघं झी मराठीवर एखाद्या नव्या मालिकेत एकत्र दिसणार आहेत.
पोस्टवर झी मराठीने हार्ट इमोजी टाकून आपली प्रतिक्रिया दिलीय, तर अभिनेत्री केतकी माटेगावकर हिनं कॉमेंट करत लिहिलं "All the best दादा!", त्यामुळे हा काहीतरी स्पेशल प्रोजेक्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तेजश्री आणि सुबोध ही जोडी याआधी प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतली होती. त्यामुळे आता हे दोघं परत एकत्र येणार अशी चाहत्यांची भावना आहे.
इन्स्टाग्रामवर तुम्ही पाहिलं असेल की तेजश्री प्रधानने आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी दिलीय. तिच्या या नव्या सिनेमाचं नाव आहे "मुजरा". तिनं सोशल मीडियावर चाहत्यांना सरप्राइज देत सांगितलं की लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अगदी कमी वेळात चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला. आता सगळ्यांना या सिनेमाची रिलीज डेट कधी जाहीर होते याचीच उत्सुकता आहे.
एका मुलाखतीत तेजश्री म्हणाली होती की, "प्रत्येक मालिकेत नायिकेवर अन्याय दाखवणं गरजेचं नाही. चांगली, प्रेरणादायी पात्रंही लोकांना भावतात." हे तिचं मत अनेकांना पटलेलंही आहे. त्यामुळे तिचा आगामी मालिका प्रोजेक्ट काही तरी वेगळं आणि दमदार असणार असं वाटतंय.
तेजश्री तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर कायम संपर्कात असते. ती तिच्या नव्या प्रोजेक्ट्सची झलक, शूटिंगमागचे क्षण, आणि वैयक्तिक आयुष्यातले आनंदाचे क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या तेजश्री प्रधान प्रेक्षकांना डबल सरप्राइज देण्यासाठी सज्ज आहे एक नवीन सिनेमा आणि पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आलेली नवीन मालिका. त्यात सुबोध भावेसोबत तिची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्यामुळे ही बातमी प्रेक्षकांसाठी नक्कीच खास आहे. आता सगळ्यांची नजर आहे झी मराठी आणि तेजश्रीच्या पुढच्या घोषणेकडे. कारण ‘सून ही ह्या घरची’ पोस्टने सगळ्यांना खूपच उत्सुक केलंय!