दिलजीत दोसांज याचा आगामी सिनेमा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. याला कारणही तसेच आहे. दिलजीतचा आगामी सिनेमा सरदार जी 3 मध्ये त्याच्यासोबत हानिया आमीर आहे. हानिया ही प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. हा सिनेमा 27 जूनला रिलीजसाठी तयार आहे. विशेष म्हणजे भारत पाकिस्तान दरम्यान तनाव असताना हा सिनेमा रिलीज होतो आहे.
या सिनेमात दिलजीत आणि हानिया घोस्ट हंटर बनले आहेत. जे यूके मधील एका मॅन्शनमधील भुताला पळवण्याच्या कामगिरीवर असतात. हॉरर कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमात निरू बाजवा आणि हानिया दिलजितसोबत रोमान्स करताना दिसत आहेत.
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. एकाने 'भारतात हा सिनेमा कोणी बघणार नाही अशी कमेंट केली आहे.’ तर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी कमेन्ट एकाने केली आहे. एक युजर म्हणतो, ये सगळे (पाकिस्तानी कलाकार) भारताविरोधात गरळ ओकतात आणि यांच्या इथले लोक या लोकांना काम देतात.’ एकाने तर हानियाचा उल्लेख थेट दहशतवादी म्हणून केला आहे, ‘टेरीरिस्टसोबत सिनेमा बनवला अशी कमेंट केली आहे.
तर 'हा युद्धादरम्यान एकही शब्द बोलला नाही, आता समजले याचे कारण काय होते ते. तो मला आवडत होता पण आता माझे मत बदलत चालले आहे.
सरदारजी 3 हा पंजाबी सिनेमातील हॉरर कॉमेडी सिनेमा फ्रँचाइजीतील तिसरा सिनेमा आहे. या सिरिजच्या पहिल्या सिनेमात Mandy Thacker हा अभिनेता मुख्य भूमिकेत होता. या सिरिजचा दूसरा सिनेमा 2016मध्ये रिलीज झाला होता. तर पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याबाबत हानियाने सोशल मिडियावर भारताविरोधात गरळ ओकली होती. याच हानियासोबत दिलजित सिनेमात दिसत असल्याने त्यावर टीकेची झोड उठली आहे.