

Kuberaa-Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3
मुंबई : साऊथ स्टार धनुष-नागार्जुनचा कुबेरा चित्रपटाची तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चलती आहे. कुबेरा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर आता कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. धनुष आणि नागार्जुन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट कुबेराने बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईड ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. पण, दुसरीकडे, आमिर खान-जनिलाय देशमुखचा चित्रपट सितारे जमीन पर ओपनिंग डे पासून चांगली कमाई करताना दिसत आहे.
रिपोर्टनुसार, कुबेराने पहिल्या दिवशी १३ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी १६ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी रविवारी १७.२५ कोटी कमाई केली. भारतात चित्रपटाने आतापर्यंत ४८.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केलं आहे. तर वर्ल्डवाईड कलेक्शन ५५ कोटी रुपये झाले आहे.
आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर ओपनिंग डे ला चांगला गल्ला जमवू शकला. आताही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सितारे जमीन पर चित्रपटाने धनुषच्या कुबेर चित्रपटाला मागे टाकले आहे. चित्रपटाने तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर ५८.९० कोटी रुपयांचे कलेक्शन कलेक्शन केलं आहे.