पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. पहिला भाग अजूनही आठवणीत असताना पुन्हा स्त्री २ ची प्रतीक्षा आहे. कॉमेडी विनोदी चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा ठरला होता. आता सिनेरसिक स्त्री च्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता आणि त्यात म्हटले होते, "द लीजेंड परत आला आहे." (Stree 2)
नुकताच लॉन्च झालेला ट्रेलर लोकप्रिय ठरला आहे. श्रद्धाच्या 'स्त्री' लूकला पुन्हा एकदा पसंती मिळाली आहे. तिचे लांब केस आणि नाकात रिंग अशा तिच्या लूकमध्ये चाहते प्रेमात आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटाची टॅगलाईन देखील आहे. सोशल मीडियावर तिचे मीम्समध्ये देखील प्रचंड लोकप्रिय झाले आहे. 'ओ स्त्री कल आना' टॅगलाईनवरून हे मीम्स पाहायला मिळत आहेत. 'स्त्री २' चा ट्रेलर आपल्याला दाखवतो की एक नवीन भूत सर्वांना त्रास देत आहे.
श्रद्धा स्त्रीच्या रूपात परत आली आहे. ट्रेलरमध्ये अनेक नवीन ट्विस्ट, टर्न आणि भितीदायक क्षणांचे आश्वासन दिलेले असले तरी, हे मजेदार संवाद ट्रेलरचे यूएसपी आहेत. पंकज त्रिपाठीच्या वन-लाइनर्स, सरळ चेहऱ्यावरील भावांपासून ते राजकुमारच्या लांबलचक संवादांपर्यंत आणि सर्व अभिनेत्यांनी त्यांचे सर्वोत्तम सादरीकरण केलेले कथानक - ट्रेलर नक्कीच प्रभावी दिसत आहे. आता चाहते स्त्री-२ या चित्रपटाची वाट पाहत आहेत.