पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच झालं आहे. घरातील सदस्य स्वत:ची प्रगती करत पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. सदस्य यासाठी घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करतात. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तिसऱ्या आठड्यात कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे हे पाहावे लागेल.
'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला सेव्ह केलं. अभिजीतने पॅडीला सेव्ह केलं. या नॉमिनेशन कार्यात टीम A विजयी झाली. कालच्या भागात वैभवने घन:श्यामला सेफ करुन अभिजीतला नॉमिनेट केल्याचं निक्की, अरबाज आणि जान्हवीला पटलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की वैभवला म्हणत आहे,"तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. तू आर्यासोबत भांडतोस..तुला तिला नॉमिनेट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती". पुढे निक्की वैभवला म्हणते,"वैभवला नाही जमत गेम खेळायला".
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.