

प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना सरप्राइज देताना दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित स्पिरीट या सिनेमाचा टीजर शेयर केला आहे. पण या टीजरमुळे शाहरुखचे फॅन्स आणि प्रभासचे फॅन्स यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याला कारण ठरले टीजरमधील एक वाक्य. (Latest Entertainment News)
संदीप यांनी शेयर केलेला हा एक ऑडियो टीजर आहे. ही या सिनेमाची पहिली झलक होती. यामुळे प्रभासचे फॅन्स आनंदित झाले. पण या प्रोमोमध्ये असे काही दिसले की शाहरुखचे फॅन्स मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. या प्रोमोमध्ये डायलॉग दिसतात तर स्क्रीनवर तृप्ती डीमरी आणि विवेक ओबेरॉय सारख्या कलाकारांचा परिचय करून दिला गेला. पण जेव्हा प्रभासची ओळख करून दिली गेली त्यावेळी असे लिहिले गेले की 'भारताचा सगळ्यात मोठा सुपरस्टार'. हे वाचताच शाहरुखचे फॅन चांगलेच भडकले आहेत. सोशल मिडियावर हे दोन्ही फॅन्स एकमेकांवर चांगलीच चिखलफेक करत आहेत.
शाहरुखच्या फॅन्सने एक्सवर स्पिरीटच्या प्रोमोचे प्रभासचे टाइटल कार्ड शेयर केले आहे. त्यात तो म्हणतो, ‘ भारतातील सगळ्यात मोठा सुपरस्टार? प्रयत्न चांगला आहे. पण मुंबई ते मोरक्कोपर्यंत मनावर राज्य करणारा एकच बादशहा शाहरुख खान.
तर दूसरा फॅन म्हणतो, ‘ प्रभासशी कोणतेही वैर नाही. कोणताही अनादर नाही. पण सगळ्यात मोठा सुपरस्टार ? खरंच?
'घंटे का बड़ा सुपरस्टार' अशीही कमेंट एकाने केली आहे.
एकजण म्हणतो, ‘ मला वाटते संदीप रेड्डी वांगाने अगदी बरोबर म्हणले आहे. प्रभास हा खरंच सुपरस्टार आहे. तर म्हणतो, प्रभासचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता त्याला सुपरस्टार म्हणणे योग्य आहे.
या सिनेमाचे शूटिंग पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. याशिवाय प्रभास हॉरर फिल्म 'द राजा साब'मध्ये दिसणार आहे.