Munnabhai 3 Update: मुन्नाभाई 3 साठीची प्रतीक्षा आता संपली; तिसऱ्या भागाविषयी अर्शद वारसीने सांगितले सत्य

या सिनेमाचा तिसरा भाग आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे
Entertainment
सिनेमाच्या तिसऱ्या भागाबाबत अर्शदने खुलासा केलाpudhari
Published on
Updated on

मुन्नाभाई ही बॉलीवूडची लोकप्रिय फ्रँचाईजींपैकी एक आहे. या फ्रँचाईजीचे आतापर्यंत 2 सिनेमे आले आहेत. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठीची आनंदाची बाब आहे. या सिनेमाचा तिसरा भाग आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील लोकप्रिय जोडगोळी मुन्नाभाई आणि त्याचा लाडका सर्किट तिसऱ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चाहते वाट पहात आहेत. सिनेमाच्या तिसऱ्या भागाबाबत अर्शदने नुकताच खुलासा केला आहे (Latest Entertainment News)

अर्शद वारसीने त्याच्या लेटेस्ट मुलाखतीमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे. ‘ संजू मध्ये वेगळ्याच प्रकारचे टॅलेंट आहे. त्याच्या सोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. मला स्क्रिप्ट लक्षात ठेवायला त्रास व्हायचा. पण संजूमुळे मला ती लक्षात राहिली. करण तो दरदिवशी सेटवर येऊन विचारायचा, आज आपण कोणता सीन करतो आहे.

Entertainment
Megha Dhade post: ……..म्हणून उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे; महेश कोठारे यांच्या समर्थनार्थ मेघा धाडेची पोस्ट चर्चेत

मुन्नाभाई 3 वर काम करत आहेत हिरानी

वरील मुलाखतीमध्ये बोलत बोलत त्याने सांगितले की, पहिल्यांदा या सिनेमाविषयी काहीच अपडेट नव्हती. पण आता राजकुमार हिरानी यांनी या सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे. ते या स्क्रिप्टवर चांगलीच मेहनत घेत आहेत.

हिरानी यांनी तिसऱ्या भागाबाबत स्पष्ट केले

अर्शद म्हणतो, मला वाटत आहे की आता हा सिनेमा बनायला हवा. मागच्या वर्षी हिरानी यांनी मला सांगितले की त्यांच्याजवळ एक खास आयडिया आहे.

मध्ये सिनेमा पडणार होता बंद

2023 मध्ये अर्शदमध्ये ने सांगितले होते की मुन्ना भाई 3 कदाचित बनणार नाही. कारण हिरानी यांना कथानकाबाबत 200 टक्के खात्री असल्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीत.

Entertainment
Dipika Kakkar Cancer: माझे केस गळून गेले आहेत कदाचित मला......; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करने सांगितली भयंकर परिस्थिती 

मुन्नाभाई ठरला करियरमधील माइलस्टोन

बॉलीवूडमध्ये मुन्नाभाई फ्रँचाईजीने राजकुमार हिरानी, संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या करियरला नवी उभारी देणारा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news