

अभिनेत्री लक्ष्मी मेनन सध्या अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. लक्ष्मी आणि तिच्या मित्रांनी आयटीमध्ये काम करत असलेल्या युवकाचे अपहरण केले. याशिवाय त्याला मारहाण केली. रविवारी ही घटना घडली आहे. यानंतर युवकाच्या तक्रारीवरुन लक्ष्मी आणि तिच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Entertainment News)
पीडित तरुण आणि लक्ष्मीचा हा वाद कोच्ची येथील रेस्टोबारपासून सुरू झाला होता. तिथे लक्ष्मी आणि त्या युवकाची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. वाद वाढू लागताच हा मुलगा मित्रांना घेऊन निघून गेला. पण काही अंतर जाताच त्याचे अपहरण झाले त्यानंतर त्याला मारहाणदेखील झाली.
रात्री जवळपास 11 वाजता तो तरुण आपल्या कारने परतत असताना लक्ष्मी आणि तिच्या मित्रांनी तेची गाडी अडवली. वाद वाढला आणि आरोपींपैकी एकाने त्या युवकाला गाडीत ढकलले. त्यावेळी जबर मारहाणदेखील केली. यादरम्यान सगळ्यांनी त्या युवकाचा फोनही काढून घेतला. जवळपास एक तासाहूनअधिक त्या युवकाला कैदेत ठेवल्यानंतर वेदिमारा जंक्शन येथे त्याला फेकून दिले.
या प्रकारात आतापर्यंत लक्ष्मीच्या तीन मित्रांना अटक झाली आहे. अनिश, मिथुन आणि सोनामोल असे या तीन आरोपींची नावे आहेत. तर लक्ष्मीचा फॉन बंद येत होता.
केरळ हायकोर्टने लक्ष्मीच्या अटकेवर ओणम होईपर्यंत स्थगिती दिली आहे. ओणमच्या सुट्ट्या संपल्या की तिच्या अटकेबाबत निर्णय होईल असे सांगितले आहे.
लक्ष्मी आणि तिच्या तीन मित्रांवर अपहरण, जबरदस्ती बंधक बनवणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, इजा करण्याचा उद्देश आणि धमकी देणे या आरोपांखली गुन्हा दाखल झाला आहे.