Neha Dhupia : प्रवासात अडकलेल्या नेहाला सोनू सूदची मदत

neha dhupia
neha dhupia

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडस्ट्रीत सगळेच कलाकार एकमेकांना मदत करताना आपण बघतोच. (Neha Dhupia) पण सोनू सूदने अभिनेत्री नेहा धूपियाला एक खास मदत केली आणि नेहाने सोनूचे आभार मानले आहेत. अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या कुटुबीयांसोबत प्रवास करत असताना तिच्या इंडिगो फ्लाईटला उशीर झाला. (Neha Dhupia)

याबद्दल तिने एक ट्विट केलं आणि या ट्विटवर सोनूने रिप्लाय देत नेहाला मदतीचा हात दिला. इंडिगो आणि सोनू सूद यांच्या सहकार्याने नेहा आणि तिच्या कुटंबीयांनी सुखाचा प्रवास केला. सोनू हा नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावून येतो तसेच तो आपल्या मित्र मंडळींना देखील मदत करण्यासाठी तत्पर असतो. सोनूच्या या मदतीसाठी नेहाने सोनूचे कौतुक केलं आणि पुन्हा एकदा सोनू रिअल हिरो असल्याचे सिद्ध झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news