Sonam Kapoor Pregnancy Photoshoot : ‘सर्वात सुंदर प्रेमळ कपल ❤️’

Sonam Kapoor Pregnancy Photoshoot : ‘सर्वात सुंदर प्रेमळ कपल ❤️’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. प्रेग्नंट सोमन आपल्या बेबीबंपसोबतचे फोटोशूट ( Sonam Kapoor Pregnancy Photoshoot ) नेहमी करत असते. सध्या सोनमने आणखी एक हटके मॅटरनिटी फोटोशूट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोनमने गेल्या काही दिवसांत रॉयल लूकमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोतील सोमनचा राजेशाही थाट चाहत्यांना पसंतीस उतरला होता. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसली होती. यानंतर सध्याही तिने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे आणखी काही फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सोनमसोबत पती आनंद आहूजादेखील स्टनिंग दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Obsessed with you. @anandahuja #everydayphenomenal.' असे म्हटले आहे. यावेळी सोमनने पांढऱ्या रंगाचा ड्रेस तर आनंद याने फिकट निळ्याच्या रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आई-वडील होण्याचा आनंद जाणवत होता. या फोटोतील खास म्हणजे, सोनमचे बेबीबंप स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोत सोनम आणि तिचा पती एकमेकांच्या सोबत दिसतायेत.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्संसोबत अनेक चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. यात सुनिता कपूर, बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया, करण बुलानी आणि अभिनेत्री दिया मिर्झा रेखी यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देताना हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. याशिवाय सोनमच्या या फोटोवर काही युजर्सनी 'सर्वात सुंदर प्रेमळ कपल ❤️', 'Omg ?' असे म्हणत काही युजर्सनी दोघांचे अभिनंदन केले आहे. याचवेळी काही नेटकऱ्यांनी फायर आणि हार्ट ईमोजी शेअर करत आहेत.

या फोटोवरून सोनमच्या प्रेंग्नशीदरम्यान आनंद आहुजा तिची संपूर्ण काळजी घेताना दिसत आहे. सतत तो तिच्यासोबत असून खाण्या- पिण्याकडे आवर्जून लक्ष ठेवत आहे. सोनम नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून अपडेट देत असते. .

️हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news