मुंबई ; पुढारी ऑनलाईन: मुंबईतील एनसीबी पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण आफ्रिकन नागरिकांकडून ३.९८० किलो वजनाचे २४ कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे.
मुंबईतील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज गुरुवारी (दि.१४) सकाळी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. याच दरम्यान एनसीबी पथकाने एका दक्षिण आफ्रिकन नागरिकांची चौकशी केली असता त्याच्याकडे २४ कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले. हे हेरॉईन सुमारे ३.९८० किलो वजनाचे आहे. एवढे हेरॉईन या व्यक्तीकडे कसे आले? आणि तो हे कोठे पोहोच करणार होता? याचा तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचलंत का?