

Sonali Bendre on Salman Khan
मुंबई - सोनाली बेंद्रेने एका मुलाखतीत सलमान खानबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती न्यू-यॉर्कमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होती, तेव्हा सलमान खानने तिला खंबीरपणे साथ दिली. तो तिच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखा वागला. सोनाली नेमकी काय म्हणाली, पाहुया..
सूरज बडजात्या दिग्दर्शित १९९९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘हम साथ साथ है’मध्ये सोनाली आणि सलमान काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंग वेळी ती सलमानच्या वर्तणुकीने खूप चिंतेत होती. पण काळ जसा पुढे जाईल, तसे ती सलमन खानला ओळखू लागली. सोनालीने मुलाखतीत सांगितले की, सलमान नेहमी जगाला आपली कठोर साईड दाखवतो. पण आतून तो एक शानदार व्यक्ती आहे.
सोनालीने सांगितलं की, सलमानची एक दयाळू बाजू देखील आहे. त्याने कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान दोन वेळा न्यूयॉर्कला येऊन भट घेतली. तो डॉक्टरांबद्दल माहिती घ्यायचा. स्वत: योग्य डॉक्टरांविषयी सल्ला द्यायचा. माझे पती गोल्डी बहलना फोन करून तब्येतीची विचारपूस करायचा. जेव्हा सलमानला समजलं की, ट्रीटमेंट योग्य सुरु आहे आणि सोनाली ठीक होत आहे, तेव्हा तो शांत बसला. कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखा तो वागला.
२०१८ मध्ये सोनालीने एक पोस्ट शेअर करून माहिती दिली होती की, ती कॅन्सरशी लढा देत आहे. भारतात उपचार घेतल्यानंतर ती कॅन्सरमुक्त झाली. तिच्यासाठी ते तीन वर्षे खूप संकटांनी भरलेले होते. पण तिने त्यावर मात केली.