

Sayali Sanjeev-Rishi Saxena starrer movie Samsaara Trailer
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या "समसारा" या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं गूढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले असून, "समसारा" हा चित्रपट येत्या २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या "समसारा" या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे यांनी केले आहे.
जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट समसारा हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा, त्यांना असलेला गूढ इतिहास अत्यंत रंजक असल्याचं ट्रेलरमधून जाणवतं आहे.
सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांची पटकथा, समीर मानेकर, निहार भावे यांचे संवादले, विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे यांचे छायांकन आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहिले आहे.